चहा प्यायची तलफ झाली आणि जीव वाचला

कारवर मोठी दरड कोसळली तरोही आतील दोघेही वाचले

टीम : ईगल आय मीडिया

माळशेज घाटात शुक्रवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दरड कोसळण्याची घटना घडली, एका कारचा दरडी खाली चक्काचूर झाला मात्र कारमधील दोघेही बचावले. केवळ त्या दोघांना चहा प्यायची तलफ झाली आणि त्यांचा जीव वाचला.

मरण आल्यावर चुकत नसते आणि वेळ नसली तर कोणतंही संकट केसाला धक्का लावू शकत नाही. याची प्रचिती माळशेज घाटात दोघांना आली. सध्या माळशेज घाट कोसळणारा पाऊस, दाट धुके, थंडगार हवा आणि सर्वदूर पसरलेली हिरवळ यामुळे स्वर्गवत झालेला आहे.

याच घाटातून नाशिक कडून पुण्याकडे येत असलेल्या कार ( mh-16, dh-9320 ) दोघांना चहा पिण्याची तलफ झाली. आल्हाददायक वातावरण असल्याने एका चहाच्या ठेल्याजवळ गाडी उभा करून दोघे ही चहा पिण्यासाठी बाहेर पडले आणि काही मिनिटात दरड कोसळली.

दरडीचा मोठा भाग कारवर कोसळल्याने आतील कोणी वाचले असण्याची शक्यताच दिसत नव्हती. मात्र त्या दोघांच्याही आयुष्याची दोरी बळकट होती म्हणून गाडीतून उतरून ते चहा पिण्यासाठी गेले आणि जीव वाचला. सायंकाळी उशिरापर्यंत दरडीचा भाग हटवण्यात आलेला नव्हता. मात्र यामुळे घाटातील वाहतूक विस्कळीत झाली. तसेच वाहनचालकांवर दरडी कोसळण्याच्या भीतीचे सावट पसरले आहे.

One thought on “चहा प्यायची तलफ झाली आणि जीव वाचला

Leave a Reply

error: Content is protected !!