माळशिरस तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची सांख्य 15
माळशिरस : ईगल आय मीडिया
माळीनगर येथे बाहेरून आलेल्या पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कातील अजून 3 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 15 झाली आहे. यासंदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार,
तालुक्यात पहिल्या 6 व आता 9 अशा एकूण 15 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत . सदाशिवनगर आणि माळशिरस येथील व्यक्ती इतर जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्ह निघाले आहेत. मात्र त्यांचा माळशिरस तालुक्यात मोठा संपर्क आढळून येत आहे. त्यामुळे यापुढे अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
आज मंगळवारी एकूण 49 स्वाब तपासणी केले आहेत. तर आज एकूण 27 जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अजूनही 44 अहवाल अप्राप्त आहेत. आत्ताची परिस्थिती पाहता तालुक्याच्या सर्व भागातून रुग्ण निघत आहेत किंवा त्यांचे संपर्क झालेले आहेत. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी वेळीच सतर्क होणे गरजेचे आहे. अन्यथा परिस्थिती गंभीर होऊ शकते असाही इशारा डॉ. मोहिते यांनी दिला आहे.
बाहेरून आलेल्या व्यक्तींना तसेच बाहेर एक दिवस ही जाऊन आलेल्या व्यक्तीना अलगीकरणामध्ये ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे .सध्या कोरोना रुग्णात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टन्स, गर्दी टाळणे ,स्वच्छतेचे नियम, हाताची स्वच्छता, मास्क वापरणे या गोष्टी पाळणे फार महत्त्वाचे आहे असेेेही मोहिते म्हणाले.
बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना विनंती आहे की आपण आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी व गावाचा आरोग्यासाठी त्वरित शासकीय यंत्रणेच्या संपर्कात यावे व अलगीकरणा मध्येच राहावे.
डॉ .रामचंद्र मोहिते, तालुका आरोग्य अधिकारी, माळशिरस.