माळशिरस तालुक्यातील कोरोनाचा कहर एकाच दिवसात 44 पॉझिटिव्ह अहवाल

माळशिरस : ईगल आय मीडिया
रविवार माळशिरस तालुक्यासाठी स्फोटक वार ठरला आहे. तालुक्यातील 7 गावांत तब्बल 43 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह लोकांची संख्या 76 एवढी झाली आहे.
या संदर्भात माळशिरस तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ रामचंद्र मोहिते यांनी माहिती दिली की, अकलूज येथे 20, माळेवाडी 1, वेळापूर 3, सदाशिवनगर 8,माळीनगर 10, नातेपुते 1, शिंदेवाडी 1 अशाप्रकारे तालुक्यात एकूण 44 रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत. तालुक्यात आतापर्यंत 76 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत . आज 3 रुग्णांना को़विड केअर सेंटर महाळुंग इथून घरी पाठविण्यात आलेले आहे . तालुक्यात तसेच बाहेर पॉझिटिव आलेल्या व्यक्तींच्या मोठा संपर्क आढळून येत आहे. अजूनही 41 अहवाल प्रलंबित आहेत. आत्ताची परिस्थिती पाहता तालुक्याच्या सर्व भागातून रुग्ण मोठा प्रमाणात निघत आहेत किंवा त्यांचे कॉन्टॅक्ट आहेत. त्यामुळे नागरिकांनी वेळीच सतर्क होणे गरजेचे आहे. अन्यथा परिस्थिती गंभीर होऊ शकते .बाहेरून आलेल्या व्यक्तींना तसेच बाहेर एक दिवस ही जाऊन आलेल्या व्यक्तीना अलगीकरणामध्ये ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे .सध्या कोरोना रुग्णात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टन्स, गर्दी टाळणे ,स्वच्छतेचे नियम, हाताची स्वच्छता, मास्क वापरणे या गोष्टी पाळणे फार महत्त्वाचे आहे अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ .रामचंद्र मोहिते यांनी दिली.

Leave a Reply

error: Content is protected !!