अकलूज, नातेपुते, पानीव, धर्मपुरी, वेळापूर, निमगाव, यशवंतनगर अनु. जातीसाठी तर राखीव
माळशिरस : ईगल आय मीडिया
माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या ग्रामपंचायती राखीव झाल्या आहेत. त्यामुळे अनेकजणांसाठी अपेक्षा वाढवणारी तर अनेकांचा भ्रमनिरास करणारी सोडत निघाली आहे. दरम्यान, अकलूज, नातेपुते, वेळापूर, यशवंतनगर, पाणीव, धर्मपुरी या महत्वाच्या ग्रामपंचायती अनु.जातीसाठी राखीव झाल्या आहेत. तर संग्रामनगर, सदाशिव नगर, फोंडशीरस, संगम, कोंढार पट्टा या ग्रामपंचायती खुल्या झाल्या आहेत.
आज बुधवार ( दिनांक 27 रोजी ) माळशिरस तालुक्यातील 107 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत पंचायत समिती माळशिरस च्या सभागृहात माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते – पाटील,विधानसभेचे आमदार राम सातपुते, पंचायत समितीच्या सभापती शोभाताई साठे, जिल्हा परिषद, पंचायत समितीसह ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यासह तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर असंख्य इच्छुकांमध्ये “कही खुशी कही गम” अशी परीस्थिती दिसून येत होती. माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे गावनिहाय आरक्षणाची सोडत पुढील प्रमाणे
अनुसूचित जमाती स्त्री राखीव
सवतगव्हाण,
अनुसुचित जाती स्त्री राखीव
धानोरे,कारूंडे, कळंबोली,उघडेवाडी, धर्मपुरी, खुडूस, फळवणी, दहेगाव, गिरझणी, खंडाळी, गारवाड, पानीव, अकलूज, पुरंदावडे
अनुसूचित जाती
जाधववाडी, आनंदनगर, गुरसाळे, मोरोची, वेळापूर, निमगाव, इस्लामपूर, तोंडले, शिंगोर्णी, कदमवाडी, बाभुळगाव, यशवंनगर, विजयवाडी, लोणंद, नातेपुते
ना मा प्रवर्ग स्त्री राखीव
माळीनगर, पळसमंडळ, तरंगफळ, बोरगाव, जांभूड, मांडकी, मारकडवाडी, वाफेगाव, महाळुंग, तांदुळवाडी, बांगर्डे, झंजेवाडी, माळखांबी, मेडद
ना.मा. प्रवर्ग
डोंबाळवाडी (खुडूस), चांदापुरी, मांडवे, भांबुर्डी, तांबेवाडी, कन्हेर, कोंडबावी, नेवरे, बचेरी, झिंजेवस्ती, विठ्ठलवाडी, काळमवाडी, शेंडचिंच, डोंबाळवाडी, कुसमोड
सर्वसाधारण स्त्री राखीव
तामशिदवाडी, कोळेगाव, मीरे, मळोली (साळमुख), तांबवे, माळेवाडी (अ) देशमुखवाडी, उंबरे(द), गिरवी, फडतरी, दसुर, रेडे, उंबरे(वि), लोंढे-मोहितेवाडी, पिंपरी, सुळेवाडी, माळेवाडी(बो), पिलीव, कुरबावी, कचरेवाडी, चौंडेसरवाडी चाकोरे, प्रताप नगर,वाघोली
सर्वसाधारण
फोंडशिरस, जळबावी, विझोरी, लवंग, गणेशगाव, खळवे, हनुमानवाडी बिजवडी, गोरडवाडी, कोथळे, बोंडले, भांब, कोंढारपट्टा, पिसेवाडी, बागेचीवाडी, मोटवाडी, पिरळे, एकशिव, तिरवंडी, सदाशिवनगर, संग्रामनगर, संगम, पठाणवस्ती ही गावे सर्ववसाधारण साठी आहेेत.