माळशिरस तालुक्यातील युवकांना रोजगार द्यावा : पै.वैभव जाधव

मळोली : ईगल आय मीडिया
मळोली (ता. माळशिरस) ,तालुक्यामध्ये सध्या काम सुरू असणाऱ्या मार्गावर अकलूज, स्थानिक युवकांना प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष वैभवबाबा जाधव यांनी केली आहे.

माळशिरस तालुक्यात सांगोला, टेम्भुर्णी,पंढरपूर,फलटण आदी भागाकडे जाणाऱ्या महामार्गाचे काम चालू असून या कामामध्ये स्थानिक भागातील युवकांना कामासाठी प्राधान्य द्यावे अशी मागणी कारणारे निवेदन वैभवबाबा जाधव यांनी माळशिरसचे तहसीलदार यांना दिले आहे.
या परिसरात पूर्वी पासूनच रस्त्याची कामे चालू असून सद्या लॉकडाऊनमुळे अनेक तरुणांच्या हाताला काम नसल्याने ,व मुबंई पुणे या ठिकाणावरून गावाकडे आलेल्या तरुणांची संख्याही जास्त असल्याने याही तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने या भागातील तरुणांना संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. पै वैभवबाबा मित्र मंडळ व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने या मागणीचा विचार केला गेला नाही तर, तहसीलदार व प्रांत कार्यालय या ठिकाणी हजारो युवकांच्या संख्येने आंदोलन केले जाईल असा इशाराही पै. वैभवबाबा जाधव यांनी दिला.

Leave a Reply

error: Content is protected !!