महिला बचत गटाच्या कर्ज माफीसाठी मनसेचा एल्गार
मनसेच्या वतीने यावेळी प्रशासन ला निवेदन देन्यात आले.
टीम : ईगल आय मीडिया
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने राज्यातील महिला बचत गटाच्या कर्ज माफीचे आंदोलन तीव्र करण्यात आले असून पंढरपूर येथे भव्य मोर्चा काढून लक्ष वेधून घेतल्यानंतर सोमवारी लातूर येथे हजारो महिलांचा मोर्चा काढण्यात आला. पडत्या पावसात या मोर्चाला झालेली गर्दी राज्य सरकारचे डोळे उघडायला लावणारी आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना लातूर च्या वतीने शेतकरी सेना प्रदेश अध्यक्ष संतोष नागरगोजे, प्रदेश सरचिटणीस तथा सहकार सेना प्रदेश अध्यक्ष दिलीपबापू धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली या महिला मोर्चा चे आयोजन केले होते. महिला बचत गटाचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे अशी मागणी करीत प्रचंड गर्दीचा महिला मोर्चा काढण्यात आला.
यावेळी जिल्हा अध्यक्ष डॉ नरशिंह भिकाने, भागवत शिंदे, किरण चव्हाण, फुलचंद कावळे व असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.