पंढरपुरातील फोटोग्राफर बंधूंना मनसेची मदत

पंढरपूर : ईगल आय मीडिया
  कोरोनामुळे अनेक छोटे मोठे व्यवसाय आर्थिक अडचणीत आले आहेत. या मध्ये फोटो ग्राफिचा व्यवसाय  देखील मोठ्या संकटात सापडला  आहे. लाॅकडाऊन मुळे गेल्या दोन महिन्यांपासून सर्वच छोटे मोठे लग्न व इतर सण  समारंभ रद्द झाले आहेत. यामुळे केवळ फोटो ग्राफी व्यवसायावर उपजीविका करणारे पंढरपुरातील अनेक तरूण बेरोजगार झाले आहेत. 

अशा संकटाच्या काळात फोटो ग्राफर व्यवसायिकांच्या मदतीला मनसे धावून आली आहे.

मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी आज पंढरपूर शहरातील गरजू फोटो ग्राफर बंधूंना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

कोरोनामुळे गेल्या दीड दोन   महिन्यापासून सर्वत्र लाॅकडाऊन आहे. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने सर्व विवाह समारंभासह विविध सार्वजिक कार्यक्रम रद्द केले आहेत. 

कार्यक्रम रद्द झाल्याने फोटो ग्राफर आणि व्हीडीओ शुटीग चा व्यवसाय जागेवरच बसला आहे. करियर करणार्यासाठी अनेक  तरुण या व्यवसायात आले आहेत. परंतु सध्याची परिस्थिती पाहाता त्याचाही भ्रमनिरास झाला आहे.

संकटात सापडलेल्या फोटो ग्राफर व्यवसायिकाना आज मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी गहू,तांदुळ,साखर,तेल  आदींसह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.  यावेळी  फोटोग्राफर असोसिएशन चे अध्यक्ष सोमनाथ भांदुले, हेमंत भाळवंनकर,विलास साळुंखे, श्रीराम बडवे, दिनेश शिळे,मनसे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिद्धेश्वर गरड, उपाध्यक्ष महेश पवार, सागर घोडके, संजय रणदिवे इत्यादी उपस्तीत होते.

Leave a Reply

error: Content is protected !!