मनसेनेचे नेते दिलीप धोत्रे यांची मागणी
पंढरपूर : ईगल आय मीडिया
कोरोना सारख्या संसर्ग रोगावर अजूनही लस किंवा औषध बाजारात उपलब्ध झाले नाही. तरीही काही औषधांचा वापर कोरोना रुग्णांसाठी केला जात आहे. यामध्ये रेमडेसिवीर, टाॅसिलीझुमाब आयटोली झुमब,या सारख्या औषधांचा समावेश आहे. या औषधांना मागणी मागणी वाढू लागल्याने औषधांची दुप्पट – तिप्पट दराने विक्री सुरु आहे. सर्वसामान्य रुग्णांची आर्थिक लुट थांबवण्यासाठी या औषधांचे दर वर्तमान पत्रांमधून जाहीर करावेत,अशी मागणी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी केली आहे.
या संदर्भात दिलीप धोत्रे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना लेखी निवेदन दिले आहे.
कोरोना विषाणूवर अद्यापही प्रभावी औषध सापडले नाही,
तरीही कोरोना रुग्णांवर काही ठरावीक औषधे देवून उपचार केले जात आहेत.
यामध्ये रेमडेशिवीर, टाॅसिलिझुमाब, आयटोलिझुमाब या सारख्या इंजेक्शनचा वापर केला जात आहे. या औषधांना रुग्णांकडून आणि डाॅक्टरांकडून मागणी वाढली आहे.
वाढत्या मागणीमुळे सध्या या औषधांची दुप्पट-तिप्पट दराने विक्री केली जात आहे.
या इंजेक्शनची पुण्यात दहा ते बारा हजार किंमत आहे. तेच इंजिक्शन सोलापुरात 34 हजार रुपयांना विकले जात असल्या गंभीर आरोप धोत्रे यांनी केला आहे.
पंढरपूर येथील एका कोरोना रुग्णांवर सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्ण अत्यंत गरीब आहे. संबंधीत डाॅक्टराने रुग्णाच्या नातेवाईकाला इंजेक्शन आणण्यासाठी चिट्टी दिली. रुग्णाचा मुलगा सोलापुरातील एका मेडीकलमध्ये इंजेक्शन आणण्यासाठी गेला असता, त्याला इंजेक्शनाची किंमत तब्बल 40000 हजार रुपये असल्याचे सांगितले. संबंधीत रुग्णांचा मुलाकडे पैसे नसल्याने त्यांच्यावर रडण्याची वेळ आली आहे. अशा अनेक गरीब रुग्णांची सध्या आर्थिक लुट सुरु आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जादा दराने औषधांची विक्री कऱणार्या मेडिकल दुकारनांवर तातडीने कारवाई करावी आणि औषधांचे दर ही जाहीर करावेत, अशी मागणी ही श्री. धोत्रे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
खासगी हाॅस्पिटल आणि मेडिकल दुकानदारांचे आर्थिक लागेबांधे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना बाधीत रुग्णांवर खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेत. औषध विक्रीमध्ये खासगी हाॅस्पिटल आणि मेडीकल दुकानदारांमध्ये आर्थिक लागेबांधे असल्याचा आरोप दिलीप धोत्रे यांनी केला आहे. महात्माफुले जन आरोग्य योजने अंतर्गत कोविड-19 रुग्णांवर उपचार कऱण्याचे शासनाने आदेश दिले आले आहेत. परंतु या योजने कोविड रुग्णांवर उपचार केले जात नाही. सध्या रुग्णांच्या नातेवाईकांची कोविडच्या नावाखाली आर्थिक लुट केली जात आहे. सरकारने हा विषय गांभीर्याने घ्यावा अन्यथा मनसेच्या वतीने सरकार विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल.
– दिलीप धोत्रे
प्रदेश सरचिटणीस,
मनसे