राज ठाकरेंच्या नवरत्नांमध्ये पंढरीच्या बापूंना स्थान !

मनसे नेते पदी दिलीपबापू धोत्रे यांची निवड


पंढरपूर : ईगल आय मीडिया

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस शाडो सहकार मंत्री दिलीपबापू धोत्रे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्वोच्च अशा मनसे नेतेपदी निवड केली. मुंबई येथील कृष्णकुंज निवस्थानी राज ठाकरे यांनी दिलीपबापू धोत्रे याना निवडीचे पत्र देऊन शुभेच्छा दिल्या.

राज साहेब यांनी जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे ती प्रामाणिक पणे पार पाडेन ,सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. एकनिष्टतेचे हे फळ आहे असे धोत्रे म्हणाले.


सन1992-93 साली सर्वप्रथम पंढरपूर महाविद्यालया च्या भारतीय विद्यार्थी सेनेच्या शाखा अध्यक्षपदी दिलिप धोत्रे यांची निवड करण्यात आली होती. त्यावेळेपासून आजतागायत दिलीप धोत्रे हे राज ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले आहेत आणि त्याचे फळ त्यांना मिळाले.
सलग 29 वर्ष धोत्रे हे राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत, कॉलेज चे शाखा अध्यक्ष ते मनसेचे नेते असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.

पंढरपूर तालुका, सोलापूर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्यात दिलीप धोत्रे यांनी आपली ओळख निर्माण केली असून राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाचा झेंडा फडकवत ठेवला आहे. राज्यातील सोलापूर जिल्हा असा एकमेव जिल्हा असावा जिथे मनसे ने ग्रामपंचायत ते विधानसभा अशा सर्व निवडणुका ताकदीने लढवल्या आहेत आणि आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. 2019 च्या पंढरपुर विधानसभा निवडणुकीत मनसे सैनिक आणि दिलीप धोत्रे यांची भूमिका निर्णायक ठरल्याचे राष्ट्रवादी चे कार्यकर्ते कबूल करीत आहेत.

निवडणुकांशिवाय धोत्रे यांनी 2012-13 चा आणि 16-18 चा दुष्काळ असो, महापूर असो, कोरोना महामारी असो, प्रत्येक संकटात दिलीप धोत्रे यांनी तन मन धन लावून काम केले आहे. सलग 2 वर्ष आलेल्या महाभयंकर कोरोनाच्या संकटात दिलिप धोत्रे यांनी हजारो कुटुंबाना मदत केली आहे. त्यामुळे पंढरपुर मध्ये गोरगरीब जनतेला दिलीप बापूं चा मोठा आधार वाटतो आहे.

आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती निवडणुकीसाठी धोत्रे यांच्या नेतृत्वाखालील मनसे ने जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना मनसे पक्षाने मोठी ताकद दिली असून राज ठाकरे यांच्या दरबारी नवरत्नांमध्ये समावेश झाल्याने जिल्ह्यात मनसेची ताकद वाढणार आहे. मनसे नेते पदी निवड झाल्याने धोत्रे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!