उमरग्यात मनसेचा मोठा महिला मोर्चा

मायक्रो फायनान्स, महिला बचत गट कर्जे माफ करण्याची मागणी

टीम : ईगल आय मीडिया

उस्मानाबाद जिल्ह्यातील मायक्रो फायनान्स व बॅंकांनी आपली सक्तीची वसुली सुरूच ठेवली होती, यामुळे मनसेच्यावतीने आज या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला उमरगा तालुक्यातील बचत गटांच्या हजारो महिला उपस्थित होत्या.

महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने प्रदेश सरचिटणीस तथा सहकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष दिलीप बापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत,उपजिल्हाध्यक्ष मा.अविनाश साळुंके यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२१.१०.२० रोजी उमरगा येथे बचत गटांच्या महिलांचा भव्य मोर्चा काढण्यात आला.


सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटात संपूर्ण जग सापडले असून,सरकारने लाॅकडाऊन सुरू केले आणि लोकांचे उद्योग धंदे बंद पडले.हातावरचा पोट असणार्यांना दररोजचा चरितार्थ चालविणे मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत सर्वत्र मायक्रो फायनान्स च्या वसुली अधिकार्यांनी वसुली सुरु ठेवल्यानेे मनसे ने काढलेेलाा महिला
मोर्चा यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष हरी जाधव, शहराध्यक्ष हेमंत बनसोडे यांच्या सह शहर व तालुक्यातील मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

यावेळी जिल्हासचिव विश्वनाथ स्वामी, ज्योतिबा येडगे, लोहारा तालुकाध्यक्ष अतुल जाधव हे आवर्जून उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!