मंगळवेढा येथे छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा देऊ

अभिजित पाटील यांची ग्वाही : निवेदन देऊन घेतला पुढाकार

मंगळवेढा : ईगल आय मीडिया

मंगळवेढा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा देण्याची तयारी dvp उद्योग समूहाचे प्रमुख अभिजित पाटील यांनी दर्शविली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मंगळवेढा येथील शिवप्रेमी नागरिक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची मागणी करीत आहेत, ती मागणी आपण पूर्ण करू, अशी ग्वाही dvp उद्योग समूहाचे प्रमुख अभिजित पाटील यांनी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असावा अशी इच्छा मंगळवेढ्यातील शिवभक्तांची आहे. मंगळवेढा व परिसरात डिसेंबर १६६५ साली छत्रपती शिवाजी महाराज येथे २५ दिवस वास्तव्य होते. ही येथील नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे येथे पुतळा असायला हवा या विचारातून श्री.अभिजीत पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला.

गेल्या २५ वर्षांपासून होत असलेल्या शिवभक्तांच्या मागणीचा विचार होत नव्हता. त्यानंतर मंगळवेढेकरांनी यासंबंधी सुरु केलेली “सह्यांची मोहीम” सुरु केली बद्दल अभिजीत पाटील यांनी पुतळा बसवण्यासाठी काय अडचण येत आहे याची नगरपालीका मुख्यधिकारी यांच्या कडून माहिती  घेतली.

शिवभक्त म्हणून एक भव्य अश्वरूढ पुतळा देण्याची तयारी पाटील यांनी दर्शवली. त्यासाठी लागणारी जागा आणि परवानगी मिळावी असे निवेदन तहसीलदार , नगराध्यक्ष , नगरपालीका मुख्यधिकारी निशिकांत पंरचडराव तसेच ज्ञानेश्वर कोंडूभैंरी यांच्याकडे अभिजीत पाटील यांनी दिले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!