संपर्कातील 23 लोक कोविड केअर सेंटरमध्ये : ३०५ क्वारंटाईन
मंगळवेढा : ईगल आय मीडिया
मंगळवेढा तालुक्यातील सलगर बुद्रुक येथे वैद्यकीय अधिकारी असलेल्या एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून त्यांच्या संपर्कात आलेल्या 23 लोकांना कोविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आलेले आहे. तसेच त्यांची रॅपिड अँटीजन टेस्ट घेण्यात येणार आहे. तर डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या कमी जोखमीच्या 305 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे अशी माहिती मंगळवेढ्याचे प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली.
या संदर्भात प्रांताधिकारी भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात, मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे राहणाऱ्या व सलगर बुद्रुक येथे वैद्यकीय सेवा देणाऱ्या पुरुष डॉक्टरचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सदर डॉक्टरवर सोलापूर येथे रुग्णालयात उपचार केले जात आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या 23 लोकांना कोविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आलेले असून त्यांची रॅपिड अँटीजन टेस्ट घेतली जाणार आहे. त्याचबरोबर संबंधित डॉक्टरांच्या संपर्कातील 305 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. यासंदर्भात मंगळवेढा तालुक्यातील आरोग्य विभाग परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज झाला असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे.