मंगळवेढा तालुक्यातील प्रशासनाला कोरोनाचा विळखा
मंगळवेढा : ईगल आय मीडिया
मंगळवेढा येथे डॉक्टर, पोलीस अधिकारी यांच्या पाठोपाठ शनिवारी रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये न्यायाधीशांचाही अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. शनिवारी 110 लोकांची रॅपिड अँटीजन टेस्ट घेण्यात आली. त्यामध्ये 108 लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले. मात्र दोन पॉझिटिव्ह अहवालात एका पुरुष न्यायाधीश यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या संदर्भात प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी माहिती दिली आहे.
विशेष म्हणजे 3 दिवसांपूर्वी सलगर बुद्रुक येथील डॉक्टर पॉझिटिव्ह आले तर शुक्रवारी सब जेलचे पोलीस अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी यांच्या बरोबरच 28 कैदी सुद्धा पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
विलगिकरण कक्षात असलेल्या 24 लोकांचे तपासणी अहवाल आले आहेत. त्यापैकी 3 लोकांचे पॉझिटिव्ह तर 21 लोकांचे निगेटिव्ह आले आहेत अशीही माहिती भोसले यांनी दिली.