मंगळवेढा : दत्ता कांबळे
30 आणि 31 ऑगस्ट 2020 रोजी मुदत संपत असलेल्या जिल्ह्यातील 123 ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये मंगळवेढा तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात येत असल्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी काढला आहे.
त्याचबरोबर 30 आणि 31 ऑगस्टपासून तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त होत असल्याने, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांचा कार्यकाल संपुष्टात येत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, करमाळा, मंगळवेढा, मोहोळ या तालुक्यातील 123 ग्रामपंचायतीची मुदत 30 व 31 ऑगस्ट 2020 पर्यंत संपुष्टात येत आहे. मात्र कोरोना जागतिक महामारीमुळे या ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुका घेता आलेल्या नाहीत. राज्य शासनाचा 25 जून 2020 रोजीचा निर्णय व आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात येत आहे. या ग्रामपंचायतींचा कारभार 30 ऑगस्टपासून प्रशासक पाहणार आहेत, अशा प्रकारचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी काढला आहे.
मंगळवेढा तालुक्यातील लमानतांडा, कात्राळ, बोराळे, डोनज, तांडोर, मूढवी, म्हमदाबाद ( शेटफळ), भोसे, लवंगी, लेंडवे चिंचाळे, अरळी, मल्लेवाडी, घरनिकी, कचरेवाडी, सलगर बुद्रुक या 15 ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त झालेले आहेत.
विस्ताराधिकारी डी ए साळुंखे :- ( लमाणतांडा, कात्राळ, बोराळे, डोनज )
विस्ताराधिकारी व्ही एम तवटे :- ( तांडोर, लवंगी, कचरेवडी, सलगर बुद्रुक )
विस्ताराधिकारी एम ए डोरले :- ( मूढवी, म्हमदाबाद शे. लेंडवे चिंचाळे )
विस्ताराधिकारी बी बी बाबर :- ( अरळी, मल्लेवाडी, घरनिकी )
विस्तराधिकारी बी के खेतडे :- ( भोसे )
विस्ताराधिकारी कृषी विभाग आणि पंचायत समिती यांच्याकडे ग्रामपंचायतीचे विभागून प्रशासन देण्यात आलेले आहे. त्याबरोबरच मागील पाच वर्षे कार्यरत असलेली ग्रामपंचायतीची सदस्य सरपंच उपसरपंच यांचा कार्यकाल संपुष्टात आलेला आहे.