मंगळवेढा तालुक्यात पावसाचा धुमाकूळ

अनेक गावांचा संपर्क तुटला : काही गावातील पूल खचले !


रड्डे : दत्ता कांबळे
मंगळवेढा तालुक्यासह ग्रामीण भागात रात्री पासून पावसाने धुमाकूळ घातला असून यामुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला असल्याचे चित्र तालुक्यातील काही भागात बघायला मिळत असून शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

तालुक्यातील जुने पूल व बंधारे काही भागात वाहून गेले असून त्या रस्त्यावरील वाहतूक पुर्णतः बंद झाली असून या भागातील दोन्ही गावांचा संपर्क तुटला असल्याचे चित्र तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत आहे.


मंगळवेढा-उमदी-विजापूर वाहतूक हुलजंती येथील पुलावरून मोठया प्रमाणात पाणी जात असल्याने वाहतूक ठप्प झाली असल्याचे चित्र असून पाण्याचा अंदाज न लागल्याने हुलजंती येथील पुलावर कंपनीचे साहित्य घेऊन जाणारा ट्रक हुलजंती येथील पुलावर पलटी झाला असून या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मंगळवेढा-जत वाहतूक मंगळवेढा,नंदेश्वर, हुन्नूर या ठिकाणातील ओढ्यावरील पुलावरून पाणी असल्याने ही वाहतूक ही ठप्प झाली आहे. शिरनांदगी येथील साठवण तलाव हा आधीच ओव्हरफलो झाला असून या भागातील ओढे नाले पूर्णपणे भरून वाहत असल्याचे दिसून येत आहे. बावची येथील पुलावरून पाणी वाहत असून पाण्याच्या विसर्गाने हा पूल पण खचला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

रड्डे येथील ग्रामदेवत श्री लक्ष्मीदेवी मंदिराच्या दोन्ही बाजूच्या ओढ्यावरील बंधारे पूर्णपणे भरून वाहत असल्याने याठिकाणी तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. हवेमध्ये गारवा आणि पाऊस असल्याने अनेकांनी घरांमधून बाहेर येणे टाळले असल्याचे चित्र या भागात दिवसभर दिसून येत होते.या पावसामुळे जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे दिसून येत आहे. पावसाचे प्रमाण वाढल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!