मंगळवेढा तालुक्यातील 79 ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण जाहीर

बोराळे, नंदेश्वर ,सिद्धापूर महिला राखीव तर भोसे ओबीसी, सलगर बु., हुलजंती सर्वसाधारण.

मंगळवेढा  : ईगल आय मीडिया

तालुक्‍यातील 79 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत आज (दि.27 ) रोजी काढण्यात आली. तहसील कार्यालयाच्या सभागृहात तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात आली. यावेळी नंदेश्वर, भोसे, बोराळे, राखीव तर हुलजांती, मारापूर, भाळवणी, अंधळगाव, मरवडे सर्वसाधारण साठी खुले राहिले आहेत. अनेक इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी पडले तर अनेकांच्या स्वप्नांना नवीन पालवी देऊन ही सोडत संपन्न झाली.

त्यामध्ये 10 जागा मागासवर्गीयांसाठी, 21 जागा इतर मागास वर्गासाठी तर 48 जागा या सर्वसाधारणसाठी राखीव झाल्या. आधीच गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक पुरुष उमेदवारांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

यावेळी झालेल्या सोडतीत मागील 23 ग्रामपंचायतींचे आरक्षण राखीव नसल्यामुळे त्यातील 10 ग्रामपंचायतीत अनुसूचित जाती राखीव ठेवण्यात आल्या.

तर नव्याने झालेल्या चोखामेळा नगर, दामाजी नगर या ग्रामपंचायतीचे आरक्षण इतर मागासवर्गीयांसाठी राखीव झाले तर 21 ओबीसी आरक्षणामधील 11 जागा चिठ्ठीद्वारे निश्‍चित झाल्या. उर्वरित 48 जागांमधील 18 जागा महिलांसाठी केल्या तर 6 जागा चिठ्ठीद्वारे निश्‍चित केल्या.

गाव आरक्षण पुढीलप्रमाणे…

सर्वसाधारण : आसबेवाडी, मरवडे, लेंडवे चिंचाळे, तांडोर, मुढवी, महमदाबाद शे., डोणज, अरळी, कर्जाळ- कात्राळ, हुलजंती, सलगर बु, पाठखळ – मेटकरवाडी, खडकी, भाळवणी, आंधळगाव, देगाव, मानेवाडी, मारोळी, लोणार, हुन्नूर, जंगलगी, शिवनगी, मारापूर, जुनोनी.

सर्वसाधारण महिला :

लमाणतांडा, मल्लेवाडी, माचणूर, कचरेवाडी, नंदेश्वर, रेवेवाडी, गुंजेगाव, उचेठाण, ढवळस, रड्डे, सलगर खु, लवंगी, माळेवाडी, हिवरगाव, ब्रह्मपुरी, सोड्डी, फटेवाडी, अकोला.

अनुसूचित जाती स्त्री : बठाण, घरनिकी, चिक्कलगी, तामदर्डी, हाजापूर

अनुसूचित जाती पुरुष : कागष्ट, डिकसळ, शिरसी, मुंढेवाढी, गणेशवाडी

ओबीसी पुरुष :

चोखोमेळा नगर, दामाजी नगर, बावची, निंबोणी, भालेवाडी, येड्राव, येळगी, रहाटेवाडी, लक्ष्मी दहीवडी, शेलेवाडी

ओबीसी स्त्री :

खवे, खोमनाळ, खुपसंगी, पौट, पडोळकरवाडी, जालीहाळ – सिद्धनकेरी, डोंगरगाव, धर्मगाव, गोणेवाडी, भोसे, नंदूर

तर बोराळे, महमदाबाद हु, सिद्धापूर, शिरनांदगी, तळसंगी, जित्ती या गावांचे आरक्षण चिठ्ठीवर निश्‍चित करण्यात आले.

यावेळी तहसीलदार स्वप्नील रावडे, निवासी नायब तहसीलदार सुधाकर मागाडे, महसूल नायब तहसीदार साळुंके, निवडणूक शाखेचे उमाकांत मोरे, महावीर माळी, इलियास चौधरी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!