भगीरथ भालके यांच्या मागणीनंतर जलसंपदा मंत्री पाटील यांचे आदेश
मंगळवेढा : ईगल आय मीडिया
कै. आ. भारत भालके यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मंजुर झालेल्या मंगळवेढा उपससिंचन योजनेच्या कामासाठी या योजनेचे लेखशीर्ष खाते उघडण्यासंदर्भात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्याचबरोबर तालुक्यातील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही विठ्ठल सहकारी चे चेअरमन भगीरथ भालके यांना दिली.
उपसा सिंचन योजनेस अर्थ संकल्पत मंजूर निधी देण्यासंदर्भात विठ्ठलचे चेअरमन भगीरथ भालके यांनी मुंबई येथे ना. पाटील यांची भेट घेऊन मागणी केली. या योजनेसाठी महाविकास आघाडीने मार्च 2020 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 10 कोटी निधीची तरतूद केलेली होती त्यापैकी योजनेचे लेखाशिर्ष लवकरच उघडणेत येऊन त्यादृष्टीने योजनेच्या कामाबाबत कार्यवाही होणार आहे.
दि 29 रोजी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात जलसंपदा विभाग यांच्या नियामक मंडळाची बैठक जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांनी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी 10 कोटींची निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी टोकन निधी या योजनेसाठी मिळावा व त्यासाठी या योजनेचे लेखशीर्ष निर्माण करावे,उजनीच्या अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी 65 कोटींची अर्थसंकल्पात तरतूद केली होती. तो ही निधी मिळावा, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील उर्वरीत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी जलसंपदा मंत्री पाटील यांच्याकडे केली.
त्यावेळी पाटील यांनी, संबंधित अधिकाऱ्यांना मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे लेखशीर्ष उघडावे, उजनीच्या अपूर्ण कामांची अंदाजपत्रक सादर करावे, निधी उपलब्ध करून देऊ असे सांगत आ. भारत नाना पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या 35 गावच्या उपसा सिंचन योजनेस निधी कमी पडू देणार नाही व योजना मार्गी लावू असे सांगितले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील प्रलंबित कामे, किंवा जलसंपदा विभागाची, उजनीची अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान कै आ. भारत भालके यांनी दि 23 नोव्हेंबर रोजी म्हणजे निधनाच्या चार दिवस आधी हॉस्पिटल मधून उपचार घेत असताना त्यांचे खाजगी स्विय सहाय्यक रावसाहेब फटे यांना व्हाट्सअप द्वारे मेसेज टाकून मंगळवेढ्याच्या पस्तीस गावासाठी अर्थसंकल्पात दहा कोटी तरतूद केली आहे. परंतु कोरोना महामारी च्या कालावधीत सरकारने सर्व विभागाचा निधी थांबवल्याने या योजनेचे लेखाशिर्ष खाते उघडले नव्हते. खाते उघडण्यासाठी भगीरथ भालके यांच्या समवेत त्या भागातील काही शेतकऱ्यांना मुंबईला घेऊन जाऊन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन खाते उघडण्यास संदर्भात मागणी करावी. त्या खात्यावर निधी वर्ग करण्यासंदर्भात पाठपुरावा करावा असे सांगितले होते.
त्यानंतर चार दिवसांनी आमदार भारत भालके यांचे अकाली निधन झाले. या घटनेला एक महिना उलटून गेल्यानंतर त्यांचे पुत्र व विठ्ठल कारखान्याचे नूतन चेअरमन भगीरथ भालके यांनी आज ( दिनांक29 रोजी )मुंबई येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे भेटून 35 गाव योजनेच्या निधीसाठी लेखाशिर्ष खाते उघडण्याची मागणी केली. व त्यास पाटील यांनी संमती दिली. त्यामुळे35 गावाला पाणी देण्याबाबतच्या योजनेचे आमदार भारत भालके यांचे स्वप्न पूर्णत्वास येण्यासाठी त्यांचे पुत्र कसोशीने प्रयत्न करीत आहेत व पाठपुरावा देखील करीत असल्याचे दिसून येत आहे.
या बैठकी प्रसंगी जलसंपदा विभागातील सचिव,व मंत्रालयीन उच्यस्तरीय अधीकारी, कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे येथील अधिकारी उपस्थित होत