मंगळवेढा येथे १००खाटांच्या उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयास मंजूरी

आ.समाधान आवताडे यांच्या प्रयत्नास यश

मंगळवेढा : ईगल आय न्यूज

मंगळवेढा शहरामध्ये असणाऱ्या उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये ३०खाटांचे विस्तारीकरण १००खाटांच्या रुग्णालयामध्ये करण्याच्या प्रस्ताव मंजूर झाला आहे. आरोग्य विभागा अंतर्गत शासन मान्यतेचे पत्र प्राप्त झाले असल्याची माहिती पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.

मंगळवेढा शहर व तालुक्यातील रुग्णांची वाढती संख्या व तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्षमीकरण होण्याच्या अनुषंगाने आ आवताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे-पाटील तसेच आरोग्यमंत्री ना.प्रा.डॉ.तानाजी सावंत यांचेकडे सदर रुग्णालयाच्या वाढीव खाट क्षमतेसाठी पाठपुरावा व पत्रव्यवहार करुन ही मागणी केली होती.

आ. समाधान आवताडे यांच्या माध्यमातून वाढीव खाट मागणीच्या पूर्ततेमुळे रुग्णांच्या आरोग्य उपचार अडी-अडचणी व समस्या यांना आता पूर्णविराम मिळणार आहे. मतदारसंघातील जनतेच्या विविध धोरणात्मक विकास कामांची मालिका आपल्या सर्वसमावेशक नेतृत्वाच्या कार्य कारभारातून पूर्ण लोकप्रतिनिधी म्हणून आ आवताडे यांची जनमाणसांमध्ये विकासाभिमुख प्रतिमा आणखी जोमाने उंचावत असल्याची भावना मतदारसंघातील जनतेमध्ये ठळकपणे दिसून येत आहे.

या वाढीव खाटांच्या भौतिक सुविधेमध्ये निरनिराळ्या आजारांवरील १४तज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित नर्स, इतर कर्मचाऱ्यांचा असा एकूण ३९ नवीन कर्मचारी स्टाफ, सुसज्ज्य आय. सी. यु., ऑपरेशन थिएटर, आदी जिल्हा रुग्णालय पातळीवरील असणाऱ्या सोयी या उपजिल्हा रुग्णालयात मिळणार आहेत.

त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील विविध आजारांवर उपचार घेणारे अनेक रुग्ण व तालुक्यातील जनतेची ही आरोग्य साधक मागणी आणि तालुका आरोग्य विभाग यांच्या आरोग्य सुविधेला गतिमानता प्राप्त करुन देण्यासाठी आ आवताडे यांनी शासनपातळीवर ही मागणी ठेवली होती. तालुका आरोग्य विभागाच्या मार्गदर्शन व देखरेखखाली अनेक मातांच्या प्रसूती, निरनिराळ्या छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया यासाठी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना खाट उपलब्ध न झाल्याने तासनतास उपचारासाठी ताटकळत आणि वेदना सहन करत प्रतिक्षा करावी लागत होती.

Leave a Reply

error: Content is protected !!