मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात

टीम : ईगल आय मीडिया

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी ठाकरे सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात आज विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाल्या नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरच यातून मार्ग काढू असं आश्वासन दिलं होतं, त्यानुसार आज अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाला अंतरिम स्थगिती देत हे प्रकरण सुनावणीसाठी मोठ्या पीठाकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. स्थगितीच्या निर्णयामुळे निर्माण झालेला तिढा सोडवण्याच्या दृष्टीने विरोधी पक्षांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागच्या बुधवारी बैठक घेतली होती. 

मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका सगळ्याच पक्षांनी घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत समाधानही व्यक्त केलं. दरम्यान आज अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला आहे.

आरक्षण स्थगिती मिळाल्या नंतर सरकार वर विरोधकांनीही आरोपांच्या फैरी झाडल्या. तसंच मराठा बांधवांनीही टीका केली. मात्र शनिवारीच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एक बैठकही पार पडली.

या बैठकीत प्रामुख्याने मराठा आरक्षणासंदर्भात काय पावलं उचलता येतील याबाबत चर्चा झाल्याचे समजले होते. दरम्यान आज सरकारतर्फे अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी फेरविचार अर्ज दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!