मराठा आरक्षणाची यापुढील लढाई आजी-माजी सरकारने मिळून लढावी.
पंढरपूर : ईगल आय मीडिया
मराठा समाजाने आपल्या न्यायहक्का साठी यापूर्वी शांततेत 58 मोर्चे काढले. त्यानंतर न्या. गायकवाड आयोगाच्या शिफारशीनुसार 16 टक्के आरक्षण उच्च न्यायालयात मंजूर झाले मात्र त्या आरक्षणला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे ही लढाई आता फक्त मराठा समाजाची नसून सरकारची आहे आसे समजून यापुढील न्यायालयीन लढाई. आजी – माजी सरकारने मिळून लढावी अशी मागणी, पंढरपुर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मोहन अनपट यांनी केली आहे.
पंढरीत आंदोलनास उपस्थित सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून सोलापूर जिल्हा बंदची हाक दिली आहे. त्यानुसार पिराची कुरोली, पटवर्धन कुरोली, चिंचणी, भंडीशेगाव, वाखरी, वाडीकुरोली, देवडे, शेळवे, आव्हे, तारटगाव आदी गावामध्ये कडकडीत बंद पाळत मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी पंढरपुर-फलटण-पुणे या प्रमुख पालखी मार्गावर पिराची कुरोली चौक येथे केंद्र व राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत रास्ता रोको आंदोलन केले. त्यावेळी मोहन अनपट बोलत होते.
यावेळी मोहन आणपट यांनी मराठा मराठा समाजाचा आणखी आंत सरकारने पाहू नये असे स्पष्ट संगताना हे आरक्षण राज्यातील काही जिल्ह्यातील मराठा नागरिकांना कुणबी मराठा म्हणून आजही दाखले दिले जात असतील तर इतर जिल्ह्यात वेगळा न्याय का? आसा सवाल उपस्थित केला. आताच्या व पूर्वीच्या सरकारला कायम सहकार्य केले आहे. म्हणून आता ही लढाई फक्त मराठा समाजाची नसून सरकारची आहे असे समजून सरकार व विरोधीपक्ष यांनी मिळून लढावी. केंद्र सरकारने त्यांना आवश्यक सहकार्य करावे, तरच हा प्रश्न लवकर सुटेल अन्यथा मराठा तरुण आक्रमक झाल्यास त्याला केंद व राज्य सरकार जबाबदार आसेल आसे त्यांनी सांगितले.
यावेळी पोलीस प्रशासनाला आपल्या मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी कुलदिप कौलगे,शंकर शिंदे, सुरज कौलगे,पांडुरंग कौलगे, परमेश्वर, ऍड. संतोष नाईकनवरे, लामकाने,दिपक सावंत,दत्तात्रय कौलगे,सतिश काळे,किशोर गाजरे,गणेश लामकाने,ज्ञानेश्वर सावंत, प्रताप चंदनकर, राधेश्याम पाटील, यांच्या सह शेकडो मराठा कार्यकर्ते उपस्थित होते