मराठा आरक्षण : विशेष अधिवेशन आणि सगे सोयरेचा आदेश मंजूर करण्यास आ. माने यांचाही पाठिंबा

मराठा आंदोलकांचा आ. यशवंत माने यांना घेराव

मोहोळ येथे समस्त सकल मराठा आंदोलकांनी आमदार यशवंत माने यांची भेट घेवून मागणी केली.

मोहोळ : eagle eye news

मोहोळ येथे समस्त सकल मराठा आंदोलकांनी आमदार श्री यशवंत माने यांची भेट घेवून मराठा आरक्षणा संदर्भात शनिवार (( दि 17 रोजी ) विशेष अधिवेशन बोलविण्याची तसेच अधिवेशनात सगे सोयरेचां आदेश पारीत करण्यात यावा अशी निवेदना व्दारे मागणी केली.


याप्रसंगी आमदार श्री यशवंत माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राव्दारे दि 17रोजी विशेष अधिवेशन बोलवावे व सगे सोयरे चा आदेश पारीत करण्याची मागणी केली.


यावेळी सिनेट सदस्य श्री अजिंक्यराणा पाटील, तालुकाध्यक्ष प्रकाश भाऊ चवरे,हनुमंत पोटरे बप्पा,भारत सुतकर,बाबा पवार, माऊली चव्हाण,बाळासाहेब गायकवाड, डॉ.प्रमोद पाटील,प्रमोद डोके,बाळासाहेब भोसले, ऍड श्रीरंग लाळे,महेश देशमुख,मुकेश बचुटे,सोमनाथ पवार,बालाजी साठे, महेश पवार, यांच्या सह मोठ्या संख्येने सकल मराठा समाज बांधव व आंदोलक उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!