मराठे हिंदु आहेत, हिंदु म्हणून तरी आरक्षण संसदेत प्रस्ताव मांडा

व्याख्याते हर्षल बागल यांचे युवराज खा.संभाजी राजेंना आवाहन


सोलापूूर : ईगल आय मीडिया


केंद्रात भाजपाचे बहुमत आहे. त्याच बहुमताच्या जोरावर एका रात्रीत कश्मिर चे 370 कलम हटवले , राममंदिरचा मुद्दा एका रात्रीत सोडवला , मग मराठा आरक्षणाचा प्रस्ताव केंद्रात बहुमताने का मंजुर होणार नाही? मराठे हिंदु आहेत अन केंद्रात सरकार हिंदुत्वादी विचारांचे आहे. मग मराठ्यांना आरक्षण मिळायला वेळ का ? असा सवाल करीत युवा व्याख्याते हर्षल बागल यांनी, मराठा आरक्षणासाठी संसदेत प्रस्ताव मांडावा असे आवाहन छत्रपती खा. संभाजी राजे यांना केले.


भाजपा सरकारच्याच शिफारसीने संभाजीराजे राज्यसभेत खासदार नियुक्त झाले आहेत. मराठे हिंदु आहेत मग हिुंत्ववादी विचारांचे सरकार बहुमतात आहे आरक्षणाचा प्रस्ताव का मांडत नाहीत. त्याला कोण विरोध करतय ते तरी समजेल. असे प्रवक्ते हर्षल बागल यांनी करताच आत्ता हिंदु मराठा धोक्यात नाही का ? भाजपाचे हिंदुत्व बेगडी आहे का ? असे अनेक सवाल उपस्थित केले.

ओबीसी मध्ये समावेश करण्याच्या मागणीला संभाजी राजे यांनी पध्दतशीर बगल देत, तो मुद्दा मला अडचणीचा राहिल मला ती मागणी करता येणार नाही . तुम्ही माझी अडचण समजुन घ्या म्हणत तुम्ही ती मागणी आमदार, खासदारांच्या तर्फे केली तर बरी होईल असे उत्तर खा.संभाजीराजे यांनी दिले.


अँट्रासिटी कायदा सुधारणासाठी एकच खासदार पुढे येतो व संसदेत बहुमताने तो मंजुर होतो. पण मराठा आरक्षणाचा प्रस्ताव देखील संसदेत माडला जात नाही . छत्रपती शिवाजी महाराज याचे वंशज युवराज संभाजी राजे हे देखील हिंदु आहेत, मग याच हिंदु राजाला हिंदुत्ववादी भाजपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करायला तब्बल चार वेळा भेट दिली नाही. हे किती मोठे दुर्देव म्हणावे लागेल असेेेही बागल म्हनालेे.

Leave a Reply

error: Content is protected !!