पंढरपूर : ईगल आय मीडिया
गेल्या 3 महिन्यापासून बंद असलेल्या मंगल कार्यालय, लॉन्स चे दरवाजे अखेर उघडणार आहेत. मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी आज यासंदर्भात आदेश काढला आहे.
गेल्या 3 महिन्यापासून राज्यातील सर्व मंगल कार्यालये, लॉन्स बंद ठेवण्यात आली आहेत. 50 लोकांच्या मर्यादेत लग्न लावण्याची परवानगी दिली असली तरी घरी अथवा घराच्या परिसरात लग्ने लावणे गैरसोयीचे होऊ लागले आहे. त्यामुळे सोशल डिस्टनसिंग आणि शासनाचे आदेश पाळून मंगल कार्यालये, लॉन्स, बिगर वातानुकूलित हॉल यामध्ये लग्ने करण्यास परवानगी द्यावी असे आदेश निंबाळकर यांनी राज्यातील महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.
त्यामुळे आता राज्यातील बंद असलेल्या मंगल कार्यालयाचे दरवाजे उघडणार आहेत.