
पंढरपूर : ईगल आय मीडिया
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंढरपूर तालुका सरचिटणीस पदी वाखरी ( ता. पंढरपूर ) येथील मारुती श्रीरंग पोरे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे पंढरपूर तालुकाध्यक्ष ऍड. दीपक पवार यांनी ही निवड केली असून आज (बुधवारी ) मारुती पोरे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.गणेश पाटील, जिल्हाउपाध्यक्ष युवराज पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे, संकेत ढवळे, शहराध्यक्ष सुधीर भोसले, युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा श्रिया भोसले, जिल्हा संघटक नरहरी देशमुख ,संकेत ढवळे, ओबीसी जिल्हाध्यक्षा साधना राऊत , चारुशिला कुलकर्णी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष अनिता पवार, आर डी पवार, आदी भोसले,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पवार साहेबांचे विचार घरा घरात पोहोचवण्याचा प्रयत्न करू !
राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल मारुती पोरे यांचा वाखरी ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संग्राम गायकवाड, सोमनाथ पोरे, दत्ता लोखंडे, सौ उमाबाई जगताप, जोतिराम पोरे, डॉ. धनाजी मस्के, संदीप चव्हाण, रामचंद्र पोरे, रंगनाथ हाके, दत्तात्रय जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बोलताना मारुती पोरे यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस हा विकासाच्या पायावर उभा राहिलेला, देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी विचाराने चालणारा पक्ष असून पक्षाचे आणि पवार साहेबांचे विचार घरा घरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू.
इसबावी येथील राष्ट्रमाता जिजाऊ सभागृहात राष्ट्रवादीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. तालुका कार्यकारणी मध्ये प्रवीण भोसले व अनील मोरे यांची कार्याध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्षपदी रणजीत लामकाने, ऍड. संतोष नाईकनवरे, रावसाहेब नागणे, बाळासो जाधव, संजय बाबर, दिलीप साळुंखे यांची निवड करण्यात आली. तसेच मुख्य संघटक पदी समीर मोरे संघटक पदी चंद्रकांत जाधव,चंद्रकांत महाडिक,रवींद्र देठे,सिद्धेश्वर पवार, शरद पाटील यांची निवड करण्यात आली.