मातोश्री ईश्वरम्मा विद्यालयाच्या प्रांगणात बोधी वृक्षाचे रोपण


फोटो
मातोश्री ईश्वरम्मा  विद्यालयात बोधी वृक्षांची पूजा करताना द्वारकानाथ साई स्वामी, सौ सुनेत्रा पवार, विजयसिंह पवार आदी.


पंढरपूर : ईगल आय न्यूज


रुक्मिणी विद्यापीठ संचलित मातोश्री ईश्वरम्मा ज्युनियर कॉलेजमध्ये बोधी वृक्ष पिंपळाच्या  विधीवत पूजा करून परमपूज्य श्री द्वारकानाथ साई स्वामी महाराज यांचे शुभहस्ते वृक्षारोपण केले. 


यावेळी बोलताना साई स्वामी म्हणाले की, हे पर्यावरण पूरक झाड असल्याने भविष्यात या झाडामुळे परिसरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढून   ज्ञानदानाचे कार्यही या विद्यापीठात वाढणार आहे, हुशार, संस्कारक्षम व संस्कृती जपणारे विद्यार्थी घडविण्याचे कार्य या संस्थेतील शिक्षकांच्या हातून होईल अशी आशा व्यक्त केली. 

 संस्थेच्या सचिवा सौ .सुनेत्राताई पवार यांनी,  विविध समाजातील गोरगरीब वर्गांना फराळ, कपडे देऊन,  तसेच फटाके मुक्त व प्लास्टिक मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले.


या कार्यक्रमासाठी  संस्थेचे मार्गदर्शक विजयसिंह पवार. जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष सुनंजय पवार, प्राचार्या नंदिनी गायकवाड, मुख्याध्यापक संतोष कवडे यांच्यासह पालक,विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गणेश डुबल यांनी केले. तर आभार इरफान शेख यांनी माणले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय भंडारे ,महेश भोसले ,धनाजी जाधव, सुधीर पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

error: Content is protected !!