ट्विट करून दिली माहिती
टीम : ईगल आय न्यूज
महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी रात्री त्यांनीच ट्विट करून ही माहिती दिली.तसेच आपल्या संपर्कात आलेल्या नी टेस्ट करून घ्यावी आणि काळजी घ्यावी असेही आवाहन केले आहे.
बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची कोरोना टेस्ट पोजिटीव्ह आली आहे, यापूर्वी जुलै2020 रोजी त्यांची टेस्ट कोरोना पोजिटीव्ह आली होती. तसेच त्यांच्या कुटुंबातील अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या सुद्धा पोजिटीव्ह आले होते.
अमिताभ बच्चन सध्या कौन बनेगा करोडपतीच्या १४ व्या पर्वाचं निवेदन करण्याचं काम करत आहेत. सध्या त्या कार्यक्रमाचं चित्रीकरण सुरु होतं.अजय देवगनच्या रनवे ३४ चित्रपटात ते होते. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ब्रह्मास्त्र चित्रपटात देखील ते चाहत्यांना पाहायला मिळतील.
अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते नियमितपणे वेगवगळ्या पोस्ट करत असतात. त्याप्रमाणं त्यांनी करोना संसर्ग झाल्याची माहिती ट्विटद्वारे चाहत्यांना दिली आहे. बच्चन यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी करोना चाचणी करुन घ्यावी आणि सुरक्षित राहावं, असं आवाहन केलं आहे.
दोन वर्षानी अमिताभ बच्चन यांना पुन्हा कोरोना लागण झाली असून ते लवकर बरे व्हावेत म्हणून फॅन्सनी प्रार्थना केल्या आहेत. लवकर बरे व्हा आणि काळजी घ्या , असे आवाहन फॅन्स करीत आहेत.