इंदापूर जवळ भीषण अपघात 4 जण ठार

गुरसाळे येथील 3 जण ठार

पंढरपूर : ईगल आय मीडिया

आज दुपारी ३ च्या सुमारास पुणे – सोलापूर हायवे वर इंदापूर शहराजवळील पायल हॉटेल जवळ झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार झाले आहेत. यामध्ये पंढरपूर तालुक्यातील 3 जनांचा समावेश आहे.

इंदापूर शहराजवळ पुणे – सोलापूर हायवे वर असणाऱ्या पायल हॉटेल जवळ ईरटीगा (MH- 46 BE- 4515) ही मोटार पुण्याकडे जात असताना अचानक टायर फुटल्याने डिव्हायडर तोडून आऊट साईडच्या दिशेने येऊन सोलापूर कडे जाणाऱ्या बुलेरो (MH -13 AZ- 3901) या गाडीला  जोरदार धडकली.

गणेश गोडसे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते

गणेश गोडसे हे काही कामानिमित्त इंदापूर तालुक्यातील एका साखर कारखान्यावर गेले होते आणि परत येताना हा अपघात झाल्याचे समजते. गणेश गोडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते तसेच शरद पवार विचार मंचचे ते पदाधिकारी होते. मयत अविनाश पवार हे गोडसे यांच्या नात्यातील आहेत.

या अपघातात बोलेरो गाडी मधील 3 जण व ईरटीगा मधील १ जण जागीच ठार झाले आहेत. यातील तीन जण पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे या गावचे रहिवासी असून शरद पवार विचार मंच चे पदाधिकारी गणेश गोडसे ( वय 38 वर्षे) अविनाश कुंडलिक पवार ( वय 28 वर्षे ) बाळासाहेब साळुंखे ( वय 60 वर्षे ) हे 3 जण ठार झाले आहेत. ईरटीगामधील १ जण (नाव समजले नाही) हे मयत असून या अपघातातील मृत व्यक्तींना तातडीने इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!