टीम : ईगल आय मीडिया
दवाखान्यात उपचारासाठी निघालेल्या मोटारसायकल वरील 3 जणांना कंटेनर ने धडक दिल्याने मोटारसायकल वरील मायलेकींचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना आज घडली आहे. यासंदर्भात अकलूज पोलिसांत नोंद झाली आहे.
वेळापूर येथील रहिवासी छाया पांडुरंग दांडगे ( वय 45 वर्षे ) त्यांची मुलगी सृष्टी पांडुरंग दांडगे ( वय 18 वर्षे ) मुलगा ओंकार पांडुरंग दांडगे ( वय 20 वर्षे ) हे तिघेजण मोटारसायकल ( क्रमांक mh01- as 2370 ) वरून अकलूज येथे दवाखान्यासाठी निघाले होते.
अकलूज जवळ असलेल्या माळेवाडी येथील शाळेच्या जवळ आल्यानंतर मालवाहतूक करणाऱ्या कंटेनर ( क्रमांक ka 01, ah 5951 ) ने धडक दिली.यामध्ये छाया दांडगे आणि सृष्टी दांडगे या माय लेकीचा जागीच मृत्यू झाला. तर ओंकार दांडगे हा गंभीर जखमी झाला असून त्याला अकलूज येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे आहे.
मयत छाया दांडगे यांचे जावई विनोदकुमार पवार यांनी अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून कंटेनर चालक शिवशंकर हादिबसप्पा ( रा.नामकल, कर्नाटक ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.