राज्यात दिवसभरात २३ हजार ३६५ नवे रुग्ण

एकूण रुग्णसंख्या 11 लाख 21 हजार : मृत्यू 30 हजार 883

टीम : ईगल आय मीडिया

राज्यात बुधवारी दिवसभरात २३ हजार ३६५ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यासोबत राज्यातील करोनाबाधित रुग्णसंख्या ११ लाख २१ हजार २२१ इतकी झाली आहे अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात कालच ४७४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांची संख्या ३० हजार ८८३ इतकी झाली आहे. बुधवारी दिवसभरात १७ हजार ५५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात असून आतार्यंत ७ लाख ९२ हजार ८३२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

राज्याचा रिकव्हरी रेट ७०.७१ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मृत्यूदर २.७५ टक्के इतका आहे. आतापर्यंत ५५ लाख ६ हजार २७६ चाचण्या करण्यात आल्या असून यामधील ११ लाख २१ हजार २२१ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या १७ लाख ५३ हजार ३४७ लोक होम क्वारंटाइन असून ३६ हजार ४६२ जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!