टीम : ईगल आय मीडिया
राज्यात कोरोनाचा प्रभाव वेगाने घटत असून नवीन वर्षात ही गुड न्यूज आली आहे, वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवीन केसेस च्या तुलनेत बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज ५९ करोना बाधितांचा मृत्यू झाला असला तरी, दिवसभरात ३ हजार ५२४ नवीन रुग्ण सापडले तर ४ हजार २७९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यात रुग्णवाढीला गेल्या काही दिवसांपासून मोठा ब्रेक लागला आहे. तुलनेने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मात्र सातत्याने कमी जास्त होत आहे. गुरुवारच्या तुलनेत आज अधिक रुग्ण करोनावर मात करून घरी परतले. त्यामुळे रिकव्हरी रेट वाढला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण मृतांचा आकडा ४९ हजार ५८० इतका झाला आहे. सध्या राज्यातील करोना मृत्यूदर २.५६ टक्के एवढा आहे.
राज्यात आज ३ हजार ५२४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून त्याचवेळी ४ हजार २७९ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण १८ लाख ३२ हजार ८२५ रुग्णांनी करोना विरुद्धची लढाई जिंकली असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ९४.६९ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आतापर्यंत करोनाच्या १ कोटी २८ लाख २३ हजार ८३४ चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यातील १९ लाख ३५ हजार ६३६ (१५.०९ टक्के ) चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात सध्या २ लाख ६९ हजार ३४८ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ३ हजार ३१४ व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. राज्यात करोना रिकव्हरी रेट वाढत असल्याने अॅक्टिव्ह रुग्णसंख्या वेगाने कमी होत आहे. आजच्या आकडेवारीनुसार सध्या करोनाच्या ५२ हजार ८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात सर्वाधिक १३ हजार ५२५ रुग्ण