राज्य सरकार कार्यकाल पूर्ण करेल
पंढरपूर : ईगल आय मीडिया
राज्यात चार महिन्यापासून कोरोनाकाळ चालू आहे. लॉकडाऊन सरकारने पुकारला परंतु दैनंदिन व्यवहा लॉकडाऊन शिथील झाले. परिणामी महाराष्ट्रात बाधितांची संस्था दिवसेंदिवस वाढत आहे. जेथे रेडझोन आहे. त्याठिकाणी सोशल डिस्टेसिंगचे पथ्य पाळले जात नसल्याने प्रत्येक जिल्ह्यात सध्या धोकादायक स्थितीत निर्माण होत आहे. त्यामुळे सोशल डिस्टेसिंगचे पथ्य राज्यातील प्रत्येक नागरिकांनी पाळने अनिवार्य आहे. पंढरपूर येथे कार्यकर्त्यांच्या भेटीला जलसंपदामंत्री जयंत पाटील आले होते तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पुढे बोलताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले सध्यातरी महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही. तीन पक्षाचे सरकार पाच वर्षे पुर्ण करेल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे सरकारमध्ये असतानाही यांनी वाढीव वीजबिला संदर्भात होळी केली. यावर बोलताना ते म्हणाले की, शेतक-यांचे प्रश्न कोणही विचारू शकतात. हे सरकार शेतकरी हिताचेच निर्णय घेत आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी काही शहरात पुन्हा लाॅकडाऊन करण्यात येत आहे. लाॅकडाऊन लावायची काही हौस नाही. प्रशासनाच्या सुचनांचे नागरिकांनी पालन करावे. नागरिकानी सोशल डिस्टसिंगचे कटाक्षाने पालन करावे तरच कोरोनाची साखळी तुटेल.
जलसंधारण विभागातील कामांचा आढावा घेण्यासाठी उजनी धराण येथील भीमानगर येथे बैठक होती. परंतु त्यांना हेलिकॉप्टर उतरण्यासाठी परवानगी न मिळाल्याने त्यांनी ती बैठक पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे निश्चित केली. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके, आमदार बबनराव शिंदे, आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, दिपक आबा साळुंखे, बळीराम साठे, युवराज पाटील, तालुकाध्यक्ष दिपक पवार, शहराध्यक्ष सुधीर भोसले, संदिप मांडवे आदी उपस्थित होते.
मला हेलिकॉप्टरची लिफ्ट मिळाली. राष्ट्रवादी पक्षातील जेष्ट नेत्यांनकडून अक्षयकुमारला हेलिकॉप्टरने आल्याने विरोध केला होता. तर आपण कसे हेलिकॉप्टरने आलात असा प्रश्न विचारला असता, मला हेलिकॉप्टरची लिफ्ट मिळाली. त्यामुळे मी हेलिकॉप्टरने आलो असल्याचे हसत हसत ना. पाटील म्हणाले.