संजय राठोडांचा मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा ?

 

संजय राठोड यांचा राजीनामा उद्धव ठाकरे स्वीकारणार का?

टीम : ईगल आय मीडिया 

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आलेल्या शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी आपला राजीनामा ‘मातोश्री’वर पाठवल्याची चर्चा सुरू आहे. संजय राठोड यांचं नाव आल्याने नैतिक जबाबदारी स्वीकारत राठोडांनी आपला राजीनामा पाठवल्याचे बोलले जात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारणार का याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, गुरुवारी राठोड हे समाजासमोर येऊन या संदर्भात आपली बाजू मांडणार असल्याचे सोमवारी सांगितले गेले होते. तत्पूर्वी ते राजीनामा देतील का याबाबत चर्चा सुरू असतानाच आज सकाळी त्यांच्या राजीनाम्याचे वृत्त आले आहे.

पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी ती भावासोबत पुण्यात रहात होती. तिने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आत्महत्येशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपने रितसर तक्रार दाखल केली. इतकंच नाही तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून, चौकशीची मागणी केली.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं. मात्र संजय राठोड यांनी पाठवलेला राजीनामा उद्धव ठाकरे स्वीकारतील का, असा प्रश्न विचारला जात आहे. संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे का पाठवला नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. उद्धव ठाकरे यांनी कारवाई केल्यास राठोड हे पहिलेच मंत्री ठरतील.

Leave a Reply

error: Content is protected !!