ना.जयंत पाटील ब्रीच कँडी रुग्णालयात

अस्वस्थ वाटू लागल्याने मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडली

टीम : ईगल आय मीडिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून हॉस्पिटलमध्ये रवाना झाले. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.  दरम्यान, पाटील यांनी आपली तब्येत चांगली असून काळजी करू नये असे ट्विट करून कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे.

जयंत पाटील यांनी नुकताच पूरग्रस्त पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला होता. जयंत पाटील यांनी सांगली, कोल्हापूरमधील पूरस्थितीची पाहणी केली होती. अजित पवारांच्या दौऱ्यातही ते सोबत होते. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पूरनुकसानीची माहिती दिली होती.


दरम्यान, आज मंत्रिमंडळ बैठक सुरु असताना, जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे जयंत पाटील स्वत: बैठकीतून बाहेर चालत आले आणि ब्रीच कँडी रुग्णालयाकडे जाण्यासाठी निघाले. अस्वस्थ वाटू लागल्याने जयंत पाटील रुग्णालयात दाखल झाले आहेत. ब्रीच कँडी रुग्णालयात जयंत पाटील यांच्यासोबत

आरोग्यमंत्री राजेश टोपे, नगरविकास मंत्री जितेंद्र आव्हाड ना. सतेज पाटील तसेच जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक सोबत आहे अशीही माहिती आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!