टीम : ईगल आय मीडिया
कोरोनाबाधित राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंढे यांची प्रकृती वेगाने सुधारत असून येत्या ३ दिवसांत त्यांना डिस्चार्च दिला जाणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जात आहे. मुंढे यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ना. मुंढे यांना कोरोना पॉजिटीव्ह असल्याचे निदान १२ जून रोजी झाले होते. त्याचवेळी त्यांचे गाडी चालक आणि अन्य ४ शासकीय कर्मचाऱ्यांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर प्रशांत भामरे व प्रशांत जोशी यांना घरी सोडण्यात आले आहे. मुंढे यांची प्रकृती वेगाने सुधारत असून येत्या २ ते ३ दिवसांत त्यांना घरी सोडले जाईल असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.