जयंत पाटील यांची अँजिओग्राफी होणार

सर्व रिपोर्ट नॉर्मल मात्र इ सी जी थोडा फरक : आरोग्यमंत्री टोपे

टीम : ईगल आय मीडिया

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची आज अँजिओग्राफी करण्यात येणार असून त्यांचे सर्व टेस्ट रिपोर्ट नॉर्मल असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. बुधवारी पाटील यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून जयंत पाटील रुग्णालयाकडे रवाना झाले होते.

दरम्यान, जयंत पाटील यांची प्रकृती स्थित असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. त्यांच्या ईसीजी रिपोर्टमध्ये काही फरक जाणवला आहे. अन्य सर्व रिपोर्ट नॉर्मल असल्याचं मात्र, उद्या त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात येणार असल्याची माहितीही टोपे यांनी दिली आहे.


जयंत पाटील यांना मंत्रिमंडळ बैठकीत थोडी अस्वस्थता जाणवत होती. मुख्यमंत्री महोदयांनी त्वरीत रुग्णालयात नेण्यास सांगितलं. आम्ही तातडीनं रुग्णालयात पोहोचलो. जयंत पाटील यांची प्रकृती चांगली आहे. ईसीजीमध्ये काही बदल जाणवतोय. 2 डी इको, बल्ड टेस्टही नॉर्मल आहे. मात्र उद्या अँजिओग्राफी केली जाणार आहे, असं टोपे यांनी सांगितलं.

रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर जयंत पाटील यांनी ट्वीट करुन आपली प्रकृती चांगली असल्याची माहिती दिली आहे. तसंच अफवांवर विश्वास ठेवू नका असंही जयंत पाटील म्हणाले.

Leave a Reply

error: Content is protected !!