आज संजय राठोड पोहोरादेवीसमोर हाजीर होणार

सहकुटुंब येणार : शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता

टीम : ईगल आय मीडिया

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले शिवसेना नेते संजय राठोड  आज सकाळी साडे अकरा वाजता पोहोरादेवी मंदिरात येणार आहेत. यावेळी यांच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. पोहरादेवी येथे संजय राठोड बंजारा समाजाला उद्देशून भाषण करण्याची दाट शक्यता आहे.

पूजा चव्हाण या युवतीच्या आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव जोडण्यात येऊ लागले आहे. त्यानंतर सुमारे 15 दिवसांत राठोड हे समोर आले नाहीत. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणानंतर नॉट रिचेबल असणारे राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड मंगळवारी पोहरादेवी मंदिरात येणार आहेत. सकाळी साधारण साडेअकराच्या सुमारास संजय राठोड सहकुटुंब याठिकाणी येतील, अशी माहिती समोर आली आहे.

पोहरादेवी मंदिराच्या आवारात एक लहान मंच उभारण्यात आला आहे. या ठिकाणी ना. संजय राठोड भाषण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज पोहरादेवीत नक्की काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.


संजय राठोड हे आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांवर पोहरादेवीचे दर्शन घेण्यासाठी येतात, आतादेखील पूजा चव्हाण प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाले आहेत. त्यामुळे संजय राठोड आज पोहरादेवीच्या दर्शनाला येणार आहेत. आम्ही लोकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, तरीही संजय राठोड आल्यानंतर याठिकाणी 15 ते 20 हजारांची गर्दी जमण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास लोकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे, असे आवाहन जितेंद्र महाराज यांनी केले.


या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पोहरादेवी मंदिराच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याठिकाणी बॉम्बशोधक पथकाची गाडीही दाखल झाली आहे. तसेच रस्त्यांवर बॅरिकेटस लावण्याचे काम सुरु आहे. जेणेकरून गर्दी जमल्यास कोणताही अनुचित प्रकार घडू नये, असा पोलिसांचा प्रयत्न आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव आल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपासून संजय राठोड यांच्यावर टोकाची टीका होत आहे. भाजपने हा मुद्दा लावून धरलेला आहे. भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. या पार्श्वभूमीवर तब्बल 15 दिवसांनंतर राठोड पहिल्यांदाच सर्वांसमोर येत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!