एम.आई.टी. वाखरी गुरुकुल येथे सोशल मीडिया दक्षता कार्यशाळा संपन्न

पंढरपूर : ईगल आय मीडिया
एम.आई .टी विश्वशांती गुरुकुल स्कूल आणि इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा पंढरपुर यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन पिंक हेल्थ उपक्रमाअंतर्गत किशोरवयीन मुले आणि त्यांच्या पालकांसाठी महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने सोशल मीडिया अवेअरनेस कार्यशाळेचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले होते.


पंढरपूर येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शेरॉन भोपटकर व डॉ. ऋजुता गोलवळकर यांनी यांनी याप्रसंगी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना सोशल मिडियाच्या विविध पैलूंबाबत माहिती सांगितली. सोशल मीडियाचा तरुण वर्गामध्ये असणारा वापर, त्याचे फायदे तसेच अतिरिक्त वापरामुळे होणारे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम या विषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पालक व विद्यार्थ्यांना सोशल मीडियाच्या वापराववर कसे नियंत्रण ठेवावे याविषयी देखील मार्गदर्शन करण्यात आले.


एम.आई .टी विश्वशांती गुरुकुल स्कूल पंढरपुर ही संस्था कोरोना सारख्या जागतिक महामारीमध्ये देखील विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होऊ नये या साठी सतत प्रयत्नशील आहे . भारतातील अनेक शैक्षणिक संस्था बंद असताना देखील या संस्थेने विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम ऑनलाइन द्वारे आयोजित करून विद्यार्थी वर्गात शिक्षणाची गोडी कायम ठेवण्यात यश मिळवले आहे.

संस्थेने ऑनलाइन अध्यापनासोबतच स्वातंत्र्य दिवस, गणेश उत्सव , हिंदी दिवस या सारखे उपक्रम ऑनलाइन द्वारे राबवून विद्यार्थ्यांना शाळेपासून दूर न राहण्याचा अनुभव दिलेला आहे व या पुढे देखील अश्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना त्यांच्या येणाऱ्या भविष्य काळात जास्तीत जास्त फायदा करून देण्यात संस्था प्रयत्नशील राहील असे आश्वासन एम. आई.टी विश्वशांती गुरुकुल स्कूल चे प्राचार्य श्री . शिवाजी गवळी तसेच ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य श्री . व्यंकट सुबईय्या यांनी दिले.

Leave a Reply

error: Content is protected !!