शिर्डी संस्थान च्या अध्यक्षपदी आ. काळे

टीम : ईगल आय मीडिया

.
देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी कोपरगावचे राष्ट्रवादी चे आमदार आशुतोष काळे यांची निवड करण्यात आली आहे. त्याच बरोबर नव्या विश्वस्तांची नावेही काल राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहेत.


विश्वस्त मंडळामध्ये, महेंद्र शेळके, सुरेश वाबळे, जयंत जाधव ,सचिन गुजर, डॉ. एकनाथ गोंदकर, राहुल कनाल, सुहास आहेर, अनुराधा आदिक, व अविनाश दंडवते यांचा विशवस्त मंडळामध्ये समावेश करण्यात आला आहे.

शिर्डी श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे कामकाज पाहण्यासाठी व पुर्ण वेळ समिती नेमण्यासाठी कोर्टाने २२ जूनची मुदत निश्चित केली होती. या ट्रस्टचे अध्यक्षपद मिळावे म्हणून कॉग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये रस्सीखेच सुरु होती. कोपरगावचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे व प्रदेश युवक काँग्रेसचे प्रमुख सत्यजीत तांबे हे ट्रस्टच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते

शिर्डी श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांची वर्णी लागली आहे. तर उपाअध्यक्षपदी शिवसेनेचे अँड जगदिश सावंत यांची निवड झाली आहे. शिर्डी संस्थानावर राष्ट्रवादी काँग्रेसचाच अध्यक्ष होईल असे भाकित वर्तविले जात होते. या अध्यक्षपदास राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!