यापुढे भगीरथ भालके यांच्याकडे तो नंबर असेल
पंढरपूर : ईगल आय मीडिया
आम.भारत भालके यांचा 9822014399 हा मोबाईल क्रमांक सार्वजनिक करण्यात आलेला होता. त्या नंबरवर कोणीही कार्यकर्ता, अडलेला – नडलेला नागरिक फोन करून आपल्या अडचणी मांडत होता. मात्र भारत भालके यांच्या निधनानंतर आता आपल्या अडचणी कुणाला सांगायच्या असा प्रश्न सर्व सामान्य लोकाना पडला होता. मात्र त्यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी वडिलांचा वारसा पुढे चालवण्याच्या इराद्याने त्यांचा सर्वजनिक असलेला 9822014399 हा मोबाईल क्रमांक सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांनी भारत नानांना ज्या प्रमाणे संपर्क साधत होते, तसेच त्याच नंबरवरून अपल्याशीही संपर्क साधावा, आपण त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू असा संदेशच दिला आहे.
आ. भारत भालके यांची खासियत म्हणजे ते सहज कुणालाही उपलब्ध व्हायचे, कुठेही भेटायचे, कुणाचेही, अनोळखी अबाल वृद्धांचे ही फोन घ्यायचे आणि त्यांची गाऱ्हाणी ऐकून घेत व लगेचच सोडवण्याचा ही प्रयत्न करीत होते. त्यांच्या याच कार्य पद्धतीमुळे भारत भालके सर्व सामान्य नागरिकांना आपलेसे वाटत होते.
त्यांच्या मोबाईलवर सहज संपर्क व्हायचा, कामे व्हायची मात्र त्यांच्या निधनानंतर कुणाशी संपर्क साधावा ? आपल्या अडचणी सोडवले अशा कुणाकडे जावे असा प्रश्न सर्व सामान्यनागरिक आणि कार्यकर्ते यांनाही पडला होता.
या पार्श्वभूमीवर युवक नेते भगीरथ भालके यांनी वडिलांचा वसा पुढे चालवण्याच्या इराद्याने त्यांचा सार्वजनिक झालेला मोबाईल क्रमांक पुढे वापरण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यापुढे त्या नंबरवर लोक फोन करू शकतील असेही त्यांनी सांगितले आहे.