विधानसभेचे स्मृतिपत्र स्व. आ. भालके कुटुंबियांना सुपूर्द

शासकीय अधिकाऱ्यांसह आम.प्रशांत परिचारक यांचीही उपस्थिती

पंढरपूर : ईगल आय मीडिया

विधासनसभेच्या वतीने स्व.भारत भालके यांच्या सन्मानार्थ देण्यात आलेले स्मृतिपत्र आज स्व.भारत नाना भालके यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी आम.प्रशांत परिचारक, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण अवचर आदी उपस्थित होते.

28 नोव्हेंबर रोजी भारत भालके यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्र विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी तत्कालीन विधानसभा सभापती नाना पटोले यांनी यापुढच्या काळात विधानसभेच्यावतीने मयत सदस्यांच्या सन्मानार्थ स्मृतिपत्र देण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार आज हे स्मृतिपत्र सरकोली येथे भारत नानांच्या घरी जाऊन शासनाच्या वतीने उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी सुपूर्द केले. यावेळी विधानपरिषद सदस्य प्रशांत परिचारक ही उपस्थित होते. हे स्मृतिपत्र श्रीमती जयश्री भालके यांनी स्वीकारले. यावेळी स्मरणार्थ महाराष्ट्र विधानसभेच्या वतीने स्मृतीपत्र देवून स्व.भारत भालके यांना आदरांजली वाहण्यात आली.

Leave a Reply

error: Content is protected !!