आ. भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर -मंगळवेढा विधानसभेचे सदस्य आम.भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

व्हीडिओ पहा आणि चॅनेल subscribe करा

आ.भालके यांना 30 ऑक्टोबर रोजी कोरोना लागण झाल्यानंतर पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी उपचार करून बरे होऊन भालके घरी आले होते,मात्र नंतर काही दिवसांनी त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर पुन्हा त्यांना उपचारासाठी रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

गेल्या 8 दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोन दिवसांपासून त्यांना जीवन सुरक्षा प्रणाली यंत्रणेवर ठेवले असल्याचे समजते. राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रकृती ची डॉक्टरांकडे चौकशी केली आहे, तसेच पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलवण्याची सूचना केली होती.

दरम्यान पंढरपूर सर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात भालके यांच्या प्रकृती विषयी चिंता व्यक्त होत असून त्यांना लवकर बरे वाटावे अशा सद्भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!