पंढरपूर शहरासह 8 गावांमध्ये केली हायमास्ट दिव्यांची शेवटची शिफारस
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर -मंगळवेढ्याचे आमदार स्व. भारतनाना भालके यांचे 27 नोव्हेंबर रोजी अकाली निधन झाले आहे. मात्र तत्पूर्वी ऑगस्ट महिन्यात आम.भालके यांनी पंढरपूर शहर, तालुक्यातील 8 गावांसाठी 25 हायमास्ट दिवे बसवण्याची शिफारस आमदार स्थानिक विकास निधीतून केली आहे. एका अर्थाने आ. भालकेयांनी जाता जाता या गावांमधील लोकांचा अंधार हटवल्याचे मानले जाते.
आ.भारत भालके यांनी आपल्या आमदार निधीतून अनेक गावांना सार्वजनिक सुविधा दिल्या आहेत, राज्य शासनाच्या विविध योजना प्रत्येक गावात पोहोचवण्याबरोबरच स्थानिक आमदार निधीतून मतदारसंघातील प्रत्येक गावात विकास कामे उभा केली आहेत. अनेक गावांमध्ये तर पहिल्यांदाच आमदार निधीतून विकास कामे झाली आहेत. यामध्ये भालके यांनी रस्ते, पाणी पुरवठा, सभामंडप, पीक अप शेड, हायमास्ट दिवे, ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास आराखडा अशा विविध योजनांतून विकास गंगा गावोगावी पोहोचवली आहे.
आ.भालके यांचे 27 नोव्हेंबर रोजी निधन झाले मात्र तत्पूर्वी कोरोनाच्या मर्यादा असूनही स्थानिक आमदार निधीतून अनेक गावांमध्ये सार्वजनिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. 1 आणि 16 ऑगस्ट या तारखांना दोन शिफारस पत्रे पाठवून भारत भालके यांनी पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागातील 25 ठिकाणी हायमास्ट दिवे बसवण्याची शिफारस केली आहे. या माध्यमातून भारत भालके यांनी या भागातील अंधार दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
*अनवली ग्रामपंचायत चावडी येथे, *गादेगाव श्री महादेव मंदिराजवळ, मलिक देवस्थान जवळ, धनंजय पाटील घराजवळ, राजन पाटील यांचे घराजवळ, स्मशान भूमीकडे जाणाऱ्या कोपऱ्यावर, वडार गल्ली, औन्धची आई देवस्थान जवळ,सर्जेराव बागल विहिरीजवळ, *वाखरी – गोविंदनगर शिंदे तालमी जवळ, धनगर गल्ली, *तरटगाव – दलित वस्ती , *चिचुंबे – दलित वस्ती , *कौठळी -पाटील मळा येथे, *तावशी – खंडोबा मंदिराजवळ, *एकलासपूर – दलित वस्ती येथे, *कासेगाव – साखराबाई गावठाणजवळ, दाते मंगल कार्यालयाच्या मागे या ठिकाणी विद्युत सुविधा 0301अंतर्गत हायमास्ट दिवा बसवण्यासाठी शिफारस केली आहे.
*पंढरपूर शहरात इसबावी येथील शिंदे चौक, कर्मवीर नगर गणपती मंदिराजवळ, श्री बाळू गोर्हे घराजवळ काळोशी, विस्थापित नगर पालिका शाळा नंबर 6 च्या मागे, लाईफ लाईन हॉस्पिटल मागे दत्त नगर, नागालँड हॉटेल मागे गुरुकुल शाळेजवळ, गोविदपुरा येथील लखुबाईल मंदीर मागे, जगदंबा वसाहत मटण मार्केट मागे,
आम.भालके हे आज जरी हयात नसले तरी त्यांनी उभा केलेली आणि लवरकच उभा राहत असलेली ही सार्वजनिक सुविधांची विकास कामे लोकांच्या कायम समोर उभा आहेत अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.