आ.भारत भालके यांना ग्रामस्थांची श्रद्धांजली

पंढरपूर : ईगल आय मीडिया
वाखरी ( ता.पंढरपूर ) येथे दिवंगत आम भारतनाना भालके यांच्या आठवणींना आणि त्यांनी गावात केलेल्या विकास कामांना ग्रामस्थांनी उजाळा दिला. नानांच्या आठवणींनी अनेक ग्रामस्थ सद्गदित झाल्याचे यावेळी दिसुन आले.
आ.भारत भालके यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांना ग्रामस्थांच्यावतीने शुक्रवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. प्रारंभी भारत भालके यांच्या प्रतिमेस फुले वाहून, दीप प्रज्वलन करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी जेष्ठ नेते गंगाधर गायकवाड, दत्तात्रय जगताप नानांच्या कार्याचा गौरव करणारी मनोगते व्यक्त केली तर किशोर चरणदास पोरे या मुलाने भारत नानांवर स्वरचित कविता सादर करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी सहकार शिरोमणी चे संचालक इब्राहिम मुजावर, माजी उपसरपंच जोतीराम पोरे, सुभाष सुरवसे, ग्रा पं सदस्य संग्राम गायकवाड, महादेव गायकवाड, आयुर्विमा विकास अधिकारी रणजित जगताप, नवनाथ बचुटे, लक्ष्मण गायकवाड, सुभाष शिंदे, राजेश गायकवाड, मारुती पोरे, महादेव पोरे, नाना पोरे, बंडू कारंडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.