आम. भारत भालके व्हेंटिलेटरवर

प्रकृती अतीशय गंभीर असल्याची रुबी च्या डॉक्टरांची माहिती

पंढरपूर :  ईगल आय मीडिया

आमदार भारत भालके यांची तब्येत गंभीर असून ते व्हेंटिलेटरवर आहेत.  त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी अधिकृत माहिती रुबीच्या डॉक्टरांनी दिली आहे.त्यामुळे आ.भालके यांच्या प्रकृतीविषयी अधिकच चिंता वाढली आहे. रूबी हॉल क्लिनिक बाहेर त्यांच्या तब्येतीबद्दलचे मेडिकल बुलेटीन दुपारी साडेचार वाजता प्रसारित करण्यात आले .

व्हीडिओ पहा आणि चॅनेल subscribe करा

 दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार , पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रुबी हॉल मध्ये येउन आमदार भालके यांना पाहिले, तसेच डॉक्टरांकडून त्यांच्या तब्येती बाबतची माहिती घेतली. रूपालीताई चाकणकर आदीसह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन विचारपूस केली. 

यावेळी स्वतः पवार यांनी मुंबईतील काही तज्ञ डॉक्टरांची आणि येथील डॉक्टरांशी चर्चा  घडवून आणली होती . भालके यांना सुखरूप परत आणण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न सुरू आहेत . त्यामध्ये स्वतः शरद पवार आणि अजित पवार यांनी जातीने लक्ष दिले असल्याचे दिसते .

दरम्यान, साडेचार वाजता प्रचंड गर्दी झाल्याने स्वतः डॉक्टरांनी तब्येतीविषयी अधिकृत माहिती दिली .आ. भालके यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे , ते व्हेंटिलेटरवर आहेत तथापि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे डॉक्टरांनी सांगितले .

Leave a Reply

error: Content is protected !!