ग्रामपंचायत बिनविरोध करा : २१ लाखाचा ते ३१ लाखाचे बक्षीस मिळवा

मोहोळचे आमदार यशवंत माने यांची घोषणा

फुलचिंचोली : ईगल आय मीडिया

मोहोळ विधानसभा मतदारसंघात निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायत बिनविरोध केल्यास सदस्य संख्येनुसार 21 ते 31 लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येईल अशी घोषणा मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी केली.

यासंदर्भात अधिक माहिती देताना आ.माने म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणूकीच्या काळात गावकीतील – भावकीतील घराघरात होणारे वादीवाद टाळण्यासाठी व गावामध्ये शांतता एकोपा निर्माण व्हावा म्हणून माजी आमदार मा राजन पाटील व जेष्ठ नेते मा बळीराम काका साठे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ विधानसभा मतदारसंघातील ज्या – ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकी लागल्या आहेत. त्या ग्रामपंचायती बिनविरोध कराव्यात.

ज्या ग्रामपंचायतची १ ते ९ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीना २१ लाखांचा तर ११ ते १७ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीना ३१ लाखांचा शासनाच्या विविध योजनेअंतर्गत बक्षीस रुपी निधी वर्षभरात देण्याची घोषणा आमदार यशवंत माने यांनी केली आहे.

ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूक अभियाना अंतर्गत मोहोळ विधानसभा मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या ग्रामपंचायतील नागरिकांना गावाच्या सर्वांगीण विकास गटतट बाजूला ठेवून एकत्रित येवून ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूक अभियान प्रकियामध्ये जास्त जास्त ग्रामपंचायतीने सहभागी व्हावे, लोकशाही समृद्ध करण्यासाठी शांतताप्रिय मार्गाने हातभार लावावा असे देखील आवाहन आमदार यशवंत माने यांनी केले आहे.

One thought on “ग्रामपंचायत बिनविरोध करा : २१ लाखाचा ते ३१ लाखाचे बक्षीस मिळवा

  1. आमदार महोदय शासनाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन निधी देणार

Leave a Reply

error: Content is protected !!