नातेपुते : ईगल आय मीडिया
भाजपचे विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत देशाचे नेते शरद पवार यांच्यावर जी अराजकीय टीका केली यांचा निषेध व्यक्त करत राष्ट्रवादी युवक काँग्रेस युवकचे पै. अक्षय भांड यांनी नातेपुते येथे पत्रकार परिषद येवुन चांगलाच खरपुन समाचार घेतला.
यावेळे ते म्हणाले.आ.पडवळकर हे जबाबदार पदावर आहेत.त्यांच्याकडुन केले गेलेले भाष्य निंदणीय आहे.जे भाजप संस्कृतीला व परंपरेला साजेसे नाही. पडवळकर यांना मिळालेली आमदारकी ही केवळ बारामती मध्ये जातीचे राजकारण करून अजितदादा पवार यांना बारामतीमध्ये रोखुन ठेवणयाची राजकीय खेळी होती . त्यांचे बक्षीस म्हणून भाजप जेष्ठ नेत्यांना डावलून विधानपरिषदेवर वर्णी लावली.निवडणुकीचया काळात एकमेकांवर चिखलफेक होते परंतु ती ही राजकीय असते व्यक्तीमत्व पातळीवर जाऊन टीका केली जात नाही. परंतु हे पडळकर यांचा आकलन शक्ती बाहेरच आहे असा यावेळी टोला लगावला. पडळकर यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील युवकांचे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन खालावला असून. ते ज्या पद्धतीने जातीय तेढ निर्माण करून राजकारणाची पोळी भाजू पाहताहेत हे सर्व जाणकार व्यक्तींना श्रुत आहे. त्यांनी मागील काळात भाजप वर केलेली जहरी टीका ही सर्वांना माहिती आहे. त्यामुळे शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेची पडळकर यांनी माफी मागावी अशी मागणी यावेळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्यावतीने पै अक्षय भांड यांनी केली.