आ. प्रशांत परिचारक यांचा कार्यकर्त्यांना संदेश
पंढरपूर : ईगल आय मिडिया
पांडुरंग परिवाराचे कुटुंब प्रमुख मोठ्या मालकांचे देहावसान झाले, ही कधीही भरून न निघणारी उणीव आहे. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरून वाटचाल करू. आम्ही सगळे आता सुखरूप आणि घरी आहोत, लवकरच तुम्हाला भेटायला येईल, मात्र आपली, आपल्या कुटुंबाची, कुटुंबातील जेष्ठांची काळजी घ्या, असे आवाहन आ. प्रशांत परिचारक यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
माजी आम. सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनानंतर कोरोनावर मात करून घरी गेल्यावर पहिल्यांदाच आम. प्रशांत परिचारक यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. त्यांची तब्येत ठीक नव्हती म्हणून जिल्ह्यातील त्यांचे समर्थक, कार्यकर्ते आणि सर्व सामान्य नागरिक ही अस्वस्थ होते. आ परिचारक यांच्या प्रकृतीची काळजीने विचारणा करीत होते. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना आणि जनतेला ही दिलासा, धीर देणारा संदेश आम. परिचारक यांनी पाठवला आहे.
6 मिनिटांच्या या व्हीडिओ मध्ये परिचारक यांनी कार्यकर्त्यांना धीर देत मालकांची उणीव कधीही भरून निघणारी नाही, त्यांची जागा कुणीही घेऊ शकत नाही. मालकांनी घालून दिलेल्या पायवाटेवरुन पुढची वाटचाल करू, आम्ही सगळे व्यवस्थित आणि घरी आहोत. तुमच्या भेटीची ओढ लागली आहे. लवकरच तुम्हाला भेटायला येईन. मात्र स्वतःची, कुटुंबाची, घरातील वडील धाऱ्यांची काळजी घ्या, आशा शब्दांत आम परिचारक यांनी कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे.
मालकांचे अंतिम संस्कार पंढरपूर ला करण्याची ईच्छा होती, परंतु शासकीय नियम मालकांनी ही कधी मोडले नाहीत, त्यामुळे शासकीय नियमांचे पालन करून पुण्यातच अंतिम संस्कार करावे लागले. हे सुद्धा दुःखद असल्याचे आ. परिचारक या व्हीडिओ मध्ये म्हणतात.
त्यांचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आ. परिचारक स्वतः शोकाकुल आणि दुःखाने व्याकुळ झाल्याचे त्यांच्या आवाजावरून जाणवते. कार्यकर्त्यांना धीर देण्यासोबतच कोरिणाविरोधात शिस्तीने लढा असेही परिचारक या संदेशात सांगतात.
कार्यकर्त्यांना मात्र हा व्हीडिओ पाहून नवीन ऊर्जा मिळाली आहे. कोरोनाच्या संकटावर नेत्यांनी मात केली असून आ. परिचारक यांच्या भेटीसाठी कार्यकर्ते आतुर झालेले दिसत आहेत.