मंगळवेढा शहरामध्ये मंजूर ३ कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन

आ. समाधान अवताडे यांच्या प्रयत्नातून मंजूर विकास कामांना शुभारंभ

प्रतिनिधी : eagle eye news

आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून मंगळवेढा शहरामध्ये मंजूर झालेल्या ३ कोटी निधीच्या विकास कामांचे भूमिपूजन आ आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. विकास कामांमध्ये बोराळे नाका ते सांगोला नाका रस्ता सुधारणा अंतर्गत डांबरीकरण करणे – २ कोटी २५ लाख, हजारे गल्ली धर्मशाळा ते प्रवीण हजारे घर रस्ता – २२.०० लाख, दिगंबर यादव घर ते सांगोला रस्ता – २२. ०० लाख,चोखामेळा चौक ते मुरलीधर चौक रस्ता १२.०० लाख, पवार घर ते प्रकाश नलवडे घर रस्ता २०.०० लाख अशी एकूण ३ कोटी रुपये एवढ्या भरघोस निधीच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे.

मंगळवेढा शहरातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने वरील कामांसाठी निधी उपलब्ध होणेसाठी आ आवताडे यांनी संबंधित शासकीय विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा सुरु ठेवला होता. गेली अनेक वर्षे निधीअभावी प्रलंबित असणाऱ्या या रस्त्यांसाठी आ आवताडे यांच्या माध्यमातून भरीव निधी मंजूर झाल्याने शहरातील महत्वपूर्ण रस्ते आता चकाचक होणार आहेत. मंगळवेढा शहरातील नेहमीच वर्दळ आणि रहदारीचा असणारा सांगोला नाका ते बोराळे नाका रस्त्याची पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वत्र चिखल व दूषित आणि घाण पाणी यांचे साम्राज्य निर्माण होऊन अतिशय बिकट अवस्था होते. परंतु आता या रस्त्याची डांबरीकरण रूपाने सुधारणा होणार असल्याने जनतेचे अनेक वर्षांचे या मार्गावरील सुरक्षित प्रवासाचे स्वप्न आ आवताडे यांच्या विकासात्मक दृष्टीमुळे अखेर प्रत्यक्षात दिसणार असल्याची चर्चा शहरवासियांमध्ये होत आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या कर्तृत्ववान नेतृत्वाच्या माध्यमातून रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य व इतर विकासात्मक गोष्टींवर आ आवताडे यांनी अक्षरशः निधीचा रतीब निर्माण केला आहे. या सर्व विकास कामांमध्ये अतिशय गरजेचा आणि महत्वपूर्ण असलेला सांगोला नाका ते बोराळे नाका या रस्त्यासाठी आ आवताडे यांच्या प्रयत्नांमुळे कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने शहरातील वाहतुकीसाठी नवसंजीवनी प्राप्त होणार आहे. परंतु आमदार आवताडे यांच्या विकासात्मक दूरदृष्टीमुळे या रस्त्याचे व इतर रस्त्यांचे डांबरीकरण होऊन शहराच्या वैभवामध्ये मोठी भर पडणार आहे.

बाबा कोंडुभैरी ( माजी सदस्य, न.पा.शिक्षण मंडळ मंगळवेढा)

यावेळी कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सुरवसे, भाजपा जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, मंगळवेढा तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी व्हा चेअरमन कैलास कोळी, माजी नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी- कोळी, प्रांताधिकारी बी आर माळी, न.पा. प्रशासन अधिकारी विनायक साळुंखे, माजी सैनिक मुरलीधर घुले, न. पा. शिक्षण मंडळ सदस्य दिगंबर यादव, दादासाहेब ओमणे, दिलीप आसबे, आझाद दारुवाले, युवक नेते युवराज शिंदे, प्रताप सावंजी, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव, सुशांत हजारे, पप्पू दारुवाले, संजय माळी, रमेश टाकणे, खंडू खंदारे, अशोक लेंडवे, बाबा कोंडुभैरी, सतिश कोंडुभैरी, प्रशांत गायकवाड, सरपंच सचिन चव्हाण, आनंद मुढे, नवनाथ दिवसे, महेश हजारे, सुधीर हजारे, दिपक उन्हाळे, अक्षय काळुंगे, तानाजी जाधव, आबा हजारे, लतिफ मकानदार, अशोक उन्हाळे, सचिन माने, बाळासाहेब थोरवत, आदी मान्यवर, संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी, पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!