आ गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त

पंढरीत गुरुवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

पंढरपूर : ईगल आय मीडिया

भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषद सदस्य आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसाचे निमित्त गुरुवारी पंढरीत सकल धनगर समाजाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.स्टेशन रोड येथील जेठाबाई धर्मशाळा येथे सकाळी 9 वाजता आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संयोजकांच्यावतीने देण्यात आली.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत कोरोणा या गंभीर आजाराने अनेक रुग्ण राज्यभर दगावत आहेत. या रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून गुरुवार 1 ऑक्टोंबर सकाळी 9 वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती धनगर आरक्षण कृती समितीचे समन्वयक सुभाष मस्के, बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष माऊली हळणवर, शहराध्यक्ष बबन येळे यांनी दिली.

रक्तदान हे श्रेष्ठदान असून रक्तदान करण्यासाठी समाज बांधवांनी पुढाकार घ्यावा या रक्तदान शिबिरा निमित्त कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला जाणार आहे. तरी पंढरपूर तालुका व शहर येथील सकल धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. यावेळी बीराप्पा मोटे, धनंजय बनसोडे, नितीन काळे, अनिकेत मेटकरी, संजय माने, सचिन शिंदे, धनु पाटील, अण्णा सलगर, नाना खांडेकर, शितल येळे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!