कोविड पश्चात आजार : याविषयी डॉ. इनामदार यांचे व्याख्यान संपन्न
टीम : ईगल आय मीडिया
पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमीत्त कारखाना कार्यस्थळावर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कोविड पाश्चात होणारे आजार व त्यावर करावे लागणारे उपचार त्याची माहिती कामगारांना मिळावी यासाठी सुप्रसिध्द हदयरोग तज्ञ डॉ.एम.के.इनामदार यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, संचालक श्री बाळासाहेब यलमार इ.उपस्थित होते. मार्गदर्शनपर व्याख्यानाची सुरुवात कारखान्याचे संस्थापक चेअरमन कै.सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन करण्यात आली.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, डॉ.एम.के. इनामदार, संचालक बाळासाहेब यलमार, अधिकारी व कर्मचारी यांनी कारखान्याचे चेअरमन आमदार श्री प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमीत्त शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी प्रस्ताविकात सुप्रसिध्द डॉ.एम.के. इनामदार यांनी वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव केला. व त्यांच्या वैद्यकीय सेवेची माहिती दिली.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.एम.के.इनामदार यांनी, कोविड काळात घ्यावयाची काळजी व कोविड नंतर होणारे आजार याबाबत सांगितले की, गेल्या सुमारे दिड वर्षापासून कोविड पेशंट तपासत असताना अनेक अनुभव आले यामध्ये एखादया व्यक्तीला कोविडची कोणतीही लक्षणे दिसत नसतील परंतु त्याला कोविड झालेला असतो व तो कोविड त्याव्यक्तीला अंतस्त पोखरत असतो. कोविडमुळे होणारे परिणाम हे दिर्घ स्वरुपाचे असतात. यामधील व्यक्तीला ऑक्सीजनची कमतरता भासते. तसेच इतरही समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे कोविड झालेल्या व्यक्तीला नंतरच्या काळातही अत्यंत काळजी घेणे गरजेचे असते.
यावेळी डॉ.एम.के.इनामदार यांनी उपस्थित कामगारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तरे देवून शंकांचे निरसन अत्यंत चांगल्या प्रकारे केले.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी तसेच वर्क्स मॅनेजर आर.बी.पाटील, प्रॉडक्शन मॅनेजर एम.आर.कुलकर्णी, चिफ अकौंटंट रविंद्र काकडे, इस्टेट मॅनेजर, श्री रमेश गाजरे, सिव्हील इंजीनिअर श्री.हणमंत नागणे, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर समीर सय्यद, कॉम्प्युटर इन्चार्ज श्री टी.एस.भोसले, हेड टाईम किपर श्री.एस.एन.कदम, सहा. कार्यालयीन अधिक्षक श्री.बी.एस.बाबर आदी उपस्थित होते. यावेळी सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कारखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधीर पोफळे यांनी केले. तसेच आभार डॉ. प्रमोद पवार यांनी मानले.